sanjay ratod will talk on puja chavan suicide case on 18 february 
विदर्भ

पूजा चव्हाण आत्महत्या : 'संजय राठोड १८ फेब्रुवारीला स्पष्ट करणार भूमिका'

सकाळ डिजिटल टीम

यवतमाळ : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याप्रकरणी चौकशी सुरू असून जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र, संजय राठोड यांनी अद्याप याप्रकरणी मौन धारण केले आहे. मात्र, आता येत्या १८ फेब्रुवारीला ते भूमिका स्पष्ट करणार असल्याचे महंत सुनील महाराज यांनी सांगितले. 

दरम्यान, संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, हे सर्व चुकीचे असून त्यांनी राजीनामा दिला नसल्याचे सुनील महाराज यांनी स्पष्ट केले आहे.

पुण्यात पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली होती. तिचे संजय राठोड यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे बोलले जात आहे. त्यामधूनच त्या तरुणीने आत्महत्या केली असल्याचाही आरोप होत आहे. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी तर थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. तसेच याप्रकरणी काही ऑडीओ क्लीप देखील समोर आल्या आहेत. त्यावरून पोलिस चौकशी करत असून चौकशीअंती जे समोर येईल, त्यावरून कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र, अद्याप संजय राठोड यांनी याप्रकरणी मौन धारण केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

SCROLL FOR NEXT