आंभोरा ः वृक्षतोडप्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी उपोषणावर बसलेले गावकरी.
आंभोरा ः वृक्षतोडप्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी उपोषणावर बसलेले गावकरी.  
विदर्भ

सरपंच, सचिवांनी केली वृक्षतोड, ग्रामस्थ म्हणता कारवाई करा !

सकाळ वृत्तसेवा

कुही/पचखेडी (जि.नागपूर) ः तालुक्‍यातील आंभोरा ग्रामपंचायतीमध्ये बेकायदेशीर वृक्षतोड करण्यात आली. सुमारे 22 लाखांचा अपहार झाल्याप्रकरणी तातडीने चौकशी करून सरपंच, उपसरपंच व सचिवांवर कारवाईची मागणी करीत गेल्या दोन दिवसांपासून ग्रामस्थांचे उपोषण सुरू आहे.

बेमुदत उपोषण सुरू
ग्रामपंचायतअंतर्गत मालोदा गावात शासनाच्या वतीने उपसा सिंचनासाठी जमीन अधिग्रहण केली. अधिग्रहणांतर्गत येणाऱ्या जमिनीवरील प्रतिबंधित वृक्षांची कत्तल करून ग्रामसेवक आणि उपसरपंच यांनी परस्पर वृक्षांचा लिलाव केला. शासन-प्रशासनातील कोण्याही जबाबदार व्यक्तींना विश्‍वासात न घेता संगनमत करून लाखो रुपयांची झाडे विकून टाकली. तसेच या प्रकरणाचा बोभाटा होऊ नये म्हणून बारा हजार रुपये ग्रामपंचायत सामान्य फंडात भरले. एकीकडे शासन शतकोटी वृक्षलागवडीचा संकल्प करून सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांसह सर्वांनी झाडे लावण्याचे आवाहन करते. दुसरीकडे, जबाबदार लोकप्रतिनिधी व लोकसेवक बेकायदेशीर वृक्षतोड करतात. या गंभीर प्रकाराकडे तक्रार करूनही तत्कालीन बीडीओ चंद्रमणी मोडक यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या सर्व प्रकाराची तत्काळ चौकशी करून दोषीवर कठोर कारवाईची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

सचिवांकडून 22 लाखांचा अपहार
सचिव विजय बारमासे यांनी 14व्या वित्तआयोग व सामान्य फंड असा एकूण बावीस लाखांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य विलास बावनगडे यांनी वरिष्ठ स्तरावर केली. परंतु, त्यावर काही झाले नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
अशा अनेक घोटाळ्याची चौकशी करून सचिवांवर फोैजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत विलास बावनगडे उपोषणाला बसले आहेत. आंभोरा खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते ऋषिभाऊ भोंगाडे, विजय बावनगळे, कामेश्वर देशमुख, सुनील हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. उपोषणाला माजी आमदार सुधीर पारवे, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष सुनील जुवार, जि. प. सदस्य शिवाजीराव सोनसरे, डॉ. विनोद जुवार, दिनेश पडोळे, प्रदीप धनरे, भास्कर भोंगाडे, गणू साखरवाडे, लांबाडे, धनू सहारे, मनोज मेश्राम तसेच कुहीचे तहसीलदार बी. एन. तीनघसे, कुही पंचायत समितीचे लवे हिरुडकर, वेलतूरचे पोलिक उपनिरीक्षक आनंद कविराज, तसेच वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.

रूपयांची उचल केली
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सचिवांनी कामावर नसणारे, गावात न राहणारे, वयाने लहान असणाऱ्या व्यक्‍तींच्या नावे एक ते दीड लाख रुपयाची उचल केली आहे. याची तातडीने चौकशी करून कडक कारवाई करावी.
-रामेश्‍वर बावनकुळे
माजी सरपंच, आंभोरा

आमची फसवणूक
माझा मुलगा अमित कुजेकर हा दोनच दिवस ग्रामपंचायतच्या कामावर गेला होता. त्याला पाचशे रुपये दिले. मात्र, सचिवांनी त्याच्या नावाने 31 मार्च 2019 ला एक लाख सतरा हजार पाचशे 44 रूपये खतवले व उचलले आहेत. ही आमची फसवणूक आहे.
-मंदा हिरामण कुजेकर
आंभोरा

सरपंच, सचिवांनी केली वृक्षतोड, ग्रामस्थ म्हणता कारवाई करा !
राहुल ढेंगे हा आंभोरा येथे राहतच नाही, याच्या नावे 5500 रुपयाची उचल केली आहे. अशा भ्रष्टाचारी पदाधिकारी व सचिवांवर फौजदारी कारवाई करा.
-भास्कर भोंगाडे
माजी सरपंच

तात्काळ दखल घ्या !
येथील गैरप्रकाराची प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी. कुही तालुका भाजपचे जाहीर याविरोधात समर्थन आहे.
-सुनील जुवार, तालुकाध्यक्ष, भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT