Saturn-Jupiters grand alliance will take place today read full story 
विदर्भ

तब्बल २० वर्षांनी आज होणार शनी-गुरूची महायुती; दोन ग्रहांमध्ये असेल फक्त ०.१ डिग्रीचे अंतर

रवींद्र शिंदे

यवतमाळ : सोमवारी (ता. २१) रात्री आकाशात शनी व गुरू हे दोन महाकाय ग्रह अगदी जवळजवळ दिसतील. वास्तविक शनी व गुरू या दोन ग्रहांच्या कक्षेत सरासरी सहा कोटी किलोमीटरचे अंतर आहे. परंतु, त्यांची कक्षेत फिरण्याची विशिष्ट गती व आपल्या दृष्टीने त्यांचा बदललेला कोन यामुळे हे दोन्ही ग्रह आपल्याला चिटकून असल्यासारखे भासतील. त्यालाच ग्रहांची ‘महायुती’ असे म्हणतात. याचदिवशी योगायोगाने वर्षातला सर्वांत लहान दिवसही आहे. यावेळी या दोन ग्रहांमध्ये फक्त ०.१ डिग्रीचे अंतर असेल.

सध्या आकाशात गुरू ग्रहाच्यावर शनी दिसतो. परंतु, गुरू ग्रह वर सरकत असल्याने सोमवारी तो शनिजवळ राहील. तो पुढेपुढे सरकत राहील. त्यामुळे सोमवारी शनी ग्रह गुरू ग्रहाच्या खाली दिसू लागेल. या दोन ग्रहांतील अंतर वाढू लागेल. वास्तविक शनी व गुरूची युती ही दर २० (१९.८५) वर्षाने होते. परंतु, हे दोन ग्रह इतक्‍या जवळ येण्याची घटना ८०० वर्षांनंतर यावर्षी पाहावयास मिळणार आहे. यापूर्वी अशी महायुती १२२६ मध्ये पाहावयास मिळाली होती.

तसे पाहता १६२३ मध्येही ही घटना घडली होती. परंतु, त्यावेळी सूर्य सानिध्यामुळे ही युती पाहता आली नाही. २० वर्षांच्या अंतराने होणारी युती यापूर्वी २८ मे २००० रोजी झाली होती. तर यापुढे ३१ ऑक्‍टोबर २०४०, ७ एप्रिल २०६०, १५ मार्च २०८० व १८ सप्टेंबर २१०० रोजी होईल. त्यापैकी १५ मार्च २०८० रोजी या दोन ग्रहांमधील अंतर आजच्या इतके कमी राहील. म्हणजेच हे दोन ग्रह इतके जवळ पाहण्यासाठी पुढील ६० वर्षे वाट पहावी लागणार आहे.

सोमवारी शनी व गुरू आकाशात जवळ दिसणार असले तरी प्रत्यक्षात या दोघांत करोडो किलोमीटरचे अंतर असेल. आकाशात ग्रह जवळ दिसतात. म्हणून मानवजातीवर त्याचे कोणतेच अनिष्ट परिणाम होत नसतात. कारण, ग्रहगोल निर्जीव स्वरूपाचे असतात व करोडो किलोमीटर दूर असतात. त्यामुळे मानवी जीवनात किंवा त्यांच्या व्यवहारात ते कोणत्याच प्रकारे हस्तक्षेप करू शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने या सर्व अवकाशीय पिंडांचे निरीक्षण करून वस्तुस्थिती समजून घ्यावयास पाहिजे.

जनतेने ग्रहांविषयींचे कोणतेही गैरसमज तथा भीती मनात न बाळगता सोमवारी या दोन ग्रहांतील अंतर कसे कसे कमी होत जाते, याचे निरीक्षण करावे व या घटनेचा आनंद घ्यावा, असे आवाहन स्काय वॉच ग्रुप यवतमाळचे अध्यक्ष रवींद्र खराब, राम जयस्वाल, प्रमोद जिरापुरे, प्रशांत भगत, देवेंद्र पांडे, उमेश शेंबाडे, भूषण ब्राम्हणे, जयंत कर्णिक, पूजा रेकलवार, मानसी फेंडर यांनी केले आहे.

नागरिकांनी कराने निरीक्षण
दर २० वर्षांच्या अंतराने गुरू व शनी यांची युती पाहायला मिळत आली आहे. यापुढेही ती तशाच पद्धतीने होणार आहे. मात्र, ८०० वर्षांनंतर गुरू व शनी पहिल्यांदाच एवढ्या जवळ येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी यांचे निरीक्षण करावे.
- रवींद्र खराबे,
अध्यक्ष, स्काय वॉच ग्रुप, यवतमाळ

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT