satyapal maharaj.jpg 
विदर्भ

सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराजांचे मातृछत्र हरविले; दुखःच्या घडीलाही समाजकार्य

सकाळ वृत्तसेवा

अकोला : श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक राष्ट्रीय प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराज यांची आई सुशीलाबाई विश्वनाथ चिंचोळकर यांचे शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता वयाच्या 92 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या आईने अगोदरच देहदनाचा संकल्प केला होता. त्यानुसार शुक्रवारी रात्रीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे देहदान करण्यात आले.

गेल्या पाच दशकाहून अधिक काळ भारतभर राष्ट्रीय, सामाजिक, विषयावर विविध ठिकाणी जाऊन प्रबधनाचे व राष्ट्रीय कीर्तन सप्तखंजिरी वाजवून राष्ट्रीय कीर्तन करणारे सत्यपाल महाराज यांच्या आई विदर्भातील शिरसोली अकोट येथील रहिवासी. सत्यपाल महाराजांच्या जडणघडणीत आईचा मोठा वाटा व त्याग आहे. पाच वर्षांपूर्वी सत्यपाल महाराज यांच्या पत्नीचेही निधन झाल्यावर त्यांनीही देहदान केले होते. वडिलांनी नेत्रदान केले होते. आता आईचेही देहदान करण्यात आले. 

आधी या प्रबोधनावर घरातूनच अंमलबजावणी
सत्यपाल महाराज त्यांच्या प्रबोधनातून समाज जागृतीचे कार्य करतात. आधी या प्रबोधनावर घरातूनच अंमलबजावणी करून मग इतरांना ते सांगत असल्याचा प्रत्यय या निमित्ताने पुन्हा एकदा आला. शिरसोली या गावी माय सुशीला नावाचे भव्य मोठे महाद्वार महाराजांनी वीस वर्षांपूर्वीच बांधले असून, सुसंस्कार शिबिराकरिता श्रीगुरुवंदन सेवाश्रम स्वतःच्या शेतात बांधले आहे. सर्व त्यांच्या अग्रवास्तव व सत्यपाल महाराजांच्या कर्तबगारी मुळे यशस्वी झाले आहे .त्यांच्या देहदानाचा संकल्प हा प्रेरणादायी असा ठरला. वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले असल्यामुळे पाच तासात देहदान करावे लागले. त्यामुळे शुक्रवारी रात्री 10.30 वा. शासकीय रुग्णालयात अकोला येथे श्रद्धांजली वाहून त्यांचे देहदान करण्यात आले. शनिवारी सकाळी 11 वाजता अकोट येथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT