scam may happen in books purchase in amravati zp 
विदर्भ

बापरे! पाच लाखांच्या पुस्तकांची खरेदी २५ लाखांत, समाजकल्याणकडून परस्पर मंजुरी

सुधीर भारती

अमरावती : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून ग्रामीण भागातील वाचनालयांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या पुस्तकांच्या निविदाप्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे पाच लाखांच्या पुस्तकांच्या संचाची खरेदी 25 लाखांमध्ये करण्यात येणार आहे. याप्रकरणाचा गवगवा होऊ लागल्यानंतर आता याप्रकरणात अधिकाऱ्यांकडून सारवासारव केली जात आहे. 

एका सदस्याने याबाबत गोंधळ केल्यानंतर याप्रकरणाला वाचा फुटली आहे. समाजकल्याण विभागाकडून ग्रामीण भागातील सार्वजनिक वाचनालयांसाठी स्पर्धात्मक पुस्तके तसेच अन्य पुस्तकांच्या संचांचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील जवळपास 125 वाचनालयांमध्ये 75 पुस्तकांचा संच निर्धारित करण्यात आला. त्यानुसारच संचाचा पुरवठा करणे अपेक्षित असताना मात्र प्रत्यक्षात कुठेतरी माशी शिंकली आणि 75 चा पुस्तकांचा संच 35 पुस्तकांवर आला. निविदाप्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी पुस्तकांबाबतचे 'ऍक्‍नॉलेजमेन्ट' लावणे गरजेचे असतानाही पुरवठादारांकडून कुठलेही कागदपत्रे लावण्यात आले नसल्याचा आरोप आहे. 3 ते 11 डिसेंबरपर्यंत ही मुदत देण्यात आली असतानाही विहित अटी, शर्ती पूर्ण न करता उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे निविदाप्रक्रिया आटोपण्यात आली. एका प्रकाशन संस्थेकडून 75 ऐवजी केवळ 11 पुस्तके वेळेवर नमूना म्हणून देण्यात आली. वाचनालयांना पुरवठा करण्यात येणाऱ्या पुस्तकांची संख्या अचानक कमी कशी काय करण्यात आली?, कुठल्याही अटी, शर्तीची पूर्तता न करता अगदी वेळेवर 25 लाखांचे टेंडर कसेकाय पास करण्यात आले? असे प्रश्‍न समितीमधील एका सदस्याने उपस्थित करून चांगलाच गोंधळ घातला होता. मात्र, नंतर संपूर्ण प्रकरण बाहेर आले. 

सभापती अनभिज्ञ -
समाजकल्याणसारख्या महत्त्वाच्या समितीच्या सभापतींनासुद्धा अंधारात ठेवण्यात आले. सभापती याबाबत अनभिज्ञ असल्याची माहिती समोर आली आहे. 

समाजकल्याण विभागाशी संबंधित याप्रकरणी अद्याप सदस्यांची तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतर आपण नियमानुसार योग्य ती कारवाई करू. 
-अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT