school colleges closed till 28 february due to corona patients increases in amravati 
विदर्भ

कोरोनाच्या नवीन 'स्ट्रेन'ची भीती; २८ फेब्रुवारीपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद

सुधीर भारती

अमरावती : अमरावतीमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून त्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य विभागसुद्धा रुग्णवाढीमुळे आश्चर्यचकीत असून कोरोनाचा हा नवीन 'स्ट्रेन' तर नाही ना? याची शहानिशा करण्यासाठी काही नमुने पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आल्याची माहिती आज (ता.11) जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. 

जिल्हाधिकारी म्हणाले, की मागील काही दिवसांत रुग्णसंख्या तसेच पॉझिटिव्हचे प्रमाण अमरावती जिल्ह्यात अधिक दिसून येत आहे. नवी दिल्ली येथील आरोग्य चमूने सुद्धा भेट देऊन अमरावतीच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे. संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. एकाच कुटुंबात पॉझिटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे त्यांनी सांगितले. पुढील एक महिना महत्त्वाचा ठरणार आहे. होम आयसोलेशनच्या नियमांचा भंग होत असून आता यापुढे नियम तोडणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय मास्कचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई वाढविण्यात आली असून, आणखी काही पथके स्थापन करण्यात येणार आहेत.

28 पर्यंत शाळा, महाविद्यालये बंद - 
कोरोनाची रुग्णसंख्या पाहता 28 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये तसेच शाळा बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. त्यानंतर रुग्णस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल म्हणाले. 

वलगावचे सेंटर पुन्हा सुरू - 
मध्यंतरी नियंत्रणात आलेल्या कोरोनाने आणखी उचल खाल्ली आहे. त्यामुळे कोविड हॉस्पिटलमध्ये सज्जतेच्या सूचना देण्यात आल्या असून ऑक्‍सिजन तसेच रेमिडेस्वीर औषधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. याशिवाय बंद असलेले वलगाव येथील लक्षणे नसलेल्या रुग्णांना ठेवण्यासाठी तसेच विलगीकरणासाठी उपयोगात असलेले 160 बेडसचे सेंटर पुन्हा सुरू केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. याशिवाय खासगी दोन रुग्णालयांनी कोविड सेंटर सुरू करण्याची परवानगी मागितल्याचे त्यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT