file photo 
विदर्भ

सर्व्हर बंद : तीन दिवसापासून कॅम्प डाकघरात काम ठप्प

संतोष ताकपिरे

अमरावतीः नको त्या गोष्टीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करणाऱ्या अनेक राजकीय पक्ष, संघटनांना कॅम्प उपडाकघरातील साध्या सर्व्हरचा प्रश्‍नही निकाली काढता आलेला नाही. या डाकघरात भारतीय डाक विभागाने लावलेले घोषणापत्र कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते.
बॅंकेप्रमाणे डाकघरात सुद्धा आर्थिक गुंतवणूक व ठेवींसंदर्भात विविध सेवा दिल्या जाते. चारवर्षापासून डाकघराचे कामकाज सुद्धा ऑनलाइन झाले. बीएसएनएलची लाइन आणि सर्व्हरची सेवा देणारी कंपनी या दोघांच्या समन्वयाने येथील सर्व्हरची सेवा सुरू असते. जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या उपडाकघरामध्ये कॅम्प डाकघराचा क्रमांक लागतो. भारतीय डाक विभागाने येथून चालविल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यवस्थेचे काम येथील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी नागरिकांना किती वेळेत पूर्ण करायला हवे. याबाबत भिंतीवर नागरिक घोषणापत्र लावलेले आहे.

रजिस्टर पत्र बुकिंग करिता जर, दोन मिनीटे लाग असेल, तर, नवीन बचत खाते, आर.डी. खाते उघडण्याकरिता दहा मिनीटे लागतात. काही कामकाज दहा मिनीट, वीस मिनीटामध्ये पूर्ण करून देण्याचे बंधन येथील कर्मचाऱ्यांवर आहेत. तसे नागरिक घोषणापत्रात नमुद आहे. परंतु ऑनलाइन कामकाज सुरू झाल्यानंतर पहिले एकवर्ष येथील सर्व्हर पूर्ण क्षमतेने चालले. परंतु मागील तीन वर्षापासून सुरू असलेले सर्व्हर डाऊनच रडगाणे चालू वर्षातही सुरूच आहे. त्यामुळे भिंतीवर लटकविलेल्या नागरिक घोषणापत्रानुसार कॅम्प उपडाकघरातील एकही कामकाज वेळेवर होत नसल्याने येथे सेवा घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसह, महिला अभिकर्त्यांनाही मन:स्ताप सहन करावा लागतो. 

समस्या का सुटत नाही
जिल्ह्यातील मुख्य उप डाकघरात येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्याकरिता कॅम्प डाकघरापासून हाकेच्या अंतरावर प्रवर डाक अधीक्षक यांचे कार्यालय आहे.  येथे साध्या सर्व्हरच्या प्रश्‍नासंदर्भात वारंवार तक्रार केल्यानंतर हा प्रश्‍न निकाली का निघत नाही. याचे उत्तर अद्याप मिळालेली नाही.
 

-संपादन ः चंद्रशेखर महाजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT