shegaon.jpg
shegaon.jpg 
विदर्भ

श्री संत गजानन महाराज संस्थानची कम्युनिटी किचनव्दारे सेवा; लॉकडाउनमध्ये दररोज गरजूंना भोजन पाकिट

सकाळ वृत्तसेवा

शेगाव (जि.बुलडाणा) : जीव भावे शिवसेवा हे ब्रिदवाक्य अंगिकारुण भक्तात देव पाहणारे शेगावचे संत गजानन महाराज संस्थानही कोरोनामुळे मदतीसाठी पुढे सरसावले आहे. लॉकडाउनमुळे सर्वसामान्य व अडकलेल्या गोरगरीब लोकांच्या पोटाची काळजी घेण्यासाठी संस्थानने कम्युनिटी किचन उपक्रम सुरू केला असून, बुलडाणा शहरासाठी दररोज दोन हजार भोजनाची पाकिटची व्यवस्था 2 एप्रिल पासून सुरू केली आहे.

संतनगरी म्हणून ओळख शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर संस्थान लॉकडाउनच्या संकटात प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुढे आले आहे. सामाजिक बांधीलकी स्वीकारून संकटकाळात नेहमीच मदत करणाऱ्या संस्थानने जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद दिला व ‘कम्युनिटी किचन’ सुरू केले. संस्थानतर्फे दररोज दोन हजार भोजन पाकिटांचे वितरण करण्यात येत आहेत. सकाळी एक हजार व सायंकाळी एक हजार असे दोन वेळा एकून दोन हजार भोजन पाकिटे शेगावातील निवारागृहे, जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना वितरित करण्यात येत आहेत. लॉकडाउनमुळे अडकलेले नागरिक मजूर, गरीब कुटुंबांनाही घरपोच भोजन पाकिटे देण्यात येत आहे.

संत गजानन महाराज मंदिर संस्थान विविध 42 प्रकल्प राबवित असते. संत गजानन महाराज संस्थान शेगावचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचा सेवाभावी कार्यात नेहमीच पुढाकार असतो, नैसर्गिक आपत्तीच्या काळातही शेगाव संस्थान हे मदतीसाठी सदाअग्रेसर असते. मंदिर सुरू असताना कधीही कुणी भाविक मंदिरातून उपाशी गेला नाही. आता लॉकडाउनमुळे मंदिर बंद आहे. तरीही जिल्हा प्रशासनाच्या हाकेला ओ देत ‘जे का रंजले गांजले त्याशी आपुले मानत’ संस्थानचे सेवाकार्य सुरू आहे. भोजन देण्याकरिता जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला श्री संत गजानन महाराज संस्थानने प्रतिसाद देऊन कम्युनिटी किचन सुरू केली. दोन एप्रिल पासून 2000 लोकांसाठी भोजन प्रसाद वितरीत केल्या जात आहे. लॉकडाउनमुळे मंदिर जरी बंद असले तरी सेवा कार्य मात्र सुरुच आहे.

भोजन पाकिटांचे व्यवस्थित वितरण करण्यासाठी तहसीलदार बुलडाणा ह्यांना योग्य ते निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. बुलडाणा शहरातील निवारागृहे आणि सामान्य रुग्णालय व इतर गरजू कुटुंबांसोबतच गावाच्याकडेवर झोपड्यात राहत असलेल्या 15 नाथजोगी कुटुंबापर्यंत सुध्दा हे जेवण काल रामनवमीच्या दिवशी पोहोचले. या वितरण व्यवस्थेत समन्वयक म्हणून उपजिल्हाधिकारी दिनेश गीते हे काम पाहत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SSLC Exam Result : दहावी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर; 'या' वेबसाइटवर पाहू शकता Result

Sakal Podcast: शिरुर लोकसभेसाठी कुणाचं पारडं राहणार जड? ते सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना

Nagpur Earthquake : नागपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंप; आठवड्याभरात चौथ्यांदा हादरली जमीन; नागरिक भयभीत

Panchang 9 May : आजच्या दिवशी दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT