यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, मृत्यूंची संख्याही वाढत आहे. आज शनिवारी (ता. ५) जिल्ह्यातील सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर नव्याने आणखी १३८ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. शिवाय आयसोलेशन वॉर्ड व विविध कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेले १०२ जण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
गेल्या चोवीस तासांत मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ५४ वर्षीय पुरुष, दिग्रस शहरातील ५८ वर्षीय पुरुष व दिग्रस तालुक्यातील ६० व ४७ वर्षीय पुरुष, उमरखेड शहरातील ५३ वर्षीय पुरुष, वणी शहरातील ६० वर्षीय पुरुष व पुसद शहरातील ४७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या १३८ जणांमध्ये ७७ पुरुष व ६१ महिला आहेत. त्यात दिग्रस शहरातील तीन पुरुष व तीन महिला, दिग्रस तालुक्यातील दोन पुरुष, यवतमाळ शहरातील २० पुरुष व १४ महिला, पुसद शहरातील १० पुरुष व १६ महिला, पुसद तालुक्यातील तीन पुरुष व दोन महिला, वणी शहरातील १७ पुरुष व आठ महिला, वणी तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, पांढरकवडा शहरातील एक पुरुष व एक महिला, घाटंजी शहरातील आठ पुरुष व सात महिला, घाटंजी तालुक्यातील दोन पुरुष व एक महिला, आर्णी शहरातील दोन पुरुष व तीन महिला, उमरखेड शहरातील आठ पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे.
सद्यःस्थितीत जिल्ह्यात ७४१ ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह भरती असून, होम आयसोलेशनमध्ये २६५ जण आहेत. सुरुवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४ हजार ६३ झाली आहे. त्यापैकी २ हजार ९४१ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात ११५ मृत्यूची नोंद आहे. सध्यास्थितीत आयसोलेशन वॉर्डात २३० जण भरती आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज शनिवारी १८० नमुने तपासणीकरिता पाठविले. सुरुवातीपासून आतापर्यंत ५४ हजार ७४२ नमुने पाठविले आहेत. तर ४७ हजार १५३ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.