corona mask 
विदर्भ

अमरावतीत आणखी सात कोरोनाबाधित, एकूण आकडा 270

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शहरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असून आज आणखी सहा महिला व एक पुरुष कोरोनाबाधित आढळून आले. मंगलधाम कॉलनी येथील 31 वर्षीय पुरुष तसेच गेटलाईफ हॉस्पिटल मधील 21 व 44 वर्षीय महिला, बुधवारा येथील 26, 22 व 45 वर्षीय महिला, तसेच अन्सारनगरातील 65 वर्षीय महिलेचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. त्यामुळे अमरावतीत कोरोनाबाधितांची संख्या आता 270 झाली आहे. काल सायंकाळी एका खासगी लॅबचा अहवाल धरून आज एकूण 7 नवे रुग्ण आढळून आले.
ऐकले नाही अन्‌ झाला कोरोना
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळा, तोंडाला मास्क लावा आणि हात वारंवार स्वच्छ धुवा, अशी सूचना केली जाते; मात्र या सूचनेचे पालन न करणाऱ्या एका आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.
संबंधित 52 वर्षीय व्यक्ती सरकारी यंत्रणेत एमपीडब्ल्यू म्हणून कार्यरत आहे. स्थानिक गेट लाइफ हॉस्पिटलमध्ये त्यांची मुलगी उपचारार्थ दाखल आहे. या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन व्यक्ती आणि परिचारिका कोरोना बाधित आढळल्या आहेत. संबंधित आरोग्य कर्मचाऱ्याच्या मुलीची प्रकृती चांगली असल्याने तिच्याजवळ थांबण्याची गरज नाही, अशी सूचना रुग्णालयातर्फे देण्यात आली होती. मात्र पोटच्या गोळ्यात जीव गुंतलेला असल्याने कर्मचाऱ्याने ती सूचना फारशी गांभीर्याने घेतली नाही. या रुग्णालयातील सारीच्या एका रुग्णाला नागपूर येथे नुकतेच हलविले. तेथेच त्या रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आणि गुरुवारी मृत्यू झाला. यापूर्वी या रुग्णालयात स्थानिक शोभानगर येथील कोरोनाबाधित व्यक्तीवर उपचार झालेला आहे.

त्यामुळे अमरावतीच्या या खासगी रुग्णालयातील व्यक्तींचे थ्रोट स्वब घेण्यात आले. त्यात संबंधित आरोग्य कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. आता या व्यक्तीच्या कुटुंबीयांचे तसेच त्याच्याशी संबंधित व्यक्तीचे नमुने घेणे अनिवार्य झाले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: पावसाने राज्याची चिंता वाढवली; पण पुढील वर्षासाठी गुड न्यूज! एल निनोबाबत ‘नोआ’नेमका काय वर्तवला अंदाज?

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

SCROLL FOR NEXT