mother 
विदर्भ

खरं आहे डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आईच असते...यातही आघाडी

भूषण काळे

अमरावती : आईच्या मायेला दुसऱ्या कशाचीही उपमा नाही, त्याची सर कशालाच येऊ शकत नाही. घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी म्हणतात ते अगदी खरेच आहे. अमरावतीच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झालेल्या किडनी ट्रॅन्सप्लॅंटच्या शस्त्रक्रियेमध्येही याचाच प्रत्यय आला.
किडनी ट्रॅन्सप्लॅंटच्या 10 शस्त्रक्रियांमध्ये 10 किडनी दात्यांपैकी 7 किडनी दात्या महिला आहेत. आणि त्यापैकी पाच महिलांनी आपल्या अपत्यांनाच किडनी दान केली आहे. यावरून किडनीदानातही आईचीच माया अधिक असल्याचे दिसते.

राज्यातील एकमेव सार्वजनिक आरोग्य केंद्र असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दोन वर्षांत तब्बल 10 किडनी ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या झाल्यात. या 10 शस्त्रक्रियांमध्ये किडनी दान करणाऱ्या 7 महिला आहेत. तर किडनी घेणा-यांमध्ये पुरुषांची संख्या सर्वाधिक आहे. 10 शस्त्रक्रियेतून 8 पुरुषांवर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे, किडनी दान करणा-यांमध्ये 60 वर्षे पूर्ण केलेल्या महिलेचाही समावेश आहे. तर 45 वर्षे पूर्ण केलेल्या दोन पुरुषांवरही यशस्वीपणे किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली.

एकच आयसीयु

रुग्णालयात एकच आयसीयु असल्याने रुग्णांना वेटिंगवर राहावे लागते. आयसीयुतील पेशंट धोक्‍याबाहेर जात नाही तोपर्यंत दुसरी शस्त्रक्रिया होत नाही. दुसरे आयसीयु तयार झाल्यास मनुष्यबळ आणि इतर साधनसामग्रीची गरज भासेल. अगोदरच मनुष्यबळाचा अभाव याठिकाणी आहे. रिक्त पदांची भरती झाल्यास रुग्णांना वेटिंगवर थांबावे लागणार नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.


शस्त्रक्रियांची आकडेवारी

किडनी घेणारे
वयोगट : पुरुष : महिला
15 ते 25 : 02 : 00
26 ते 35 : 03 : 01
36 ते 45 : 01 : 01
45 अधिक : 02 : 00
--
किडनी दाते
वयोगट : पुरुष : महिला
30 ते 30 : 01 : 01
41 ते 50 : 00 : 03
51 ते 60 : 02 : 02
60 अधिक : 00 : 01

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT