File photo
File photo 
विदर्भ

अमरावती जिल्ह्यात सतराशे सार्वजनिक गणेशोत्सव

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर असतानाच, सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात 1 हजार 683 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जाईल. त्यापैकी 281 ठिकाणी "एक गाव एक गणपती' ही संकल्पना यावर्षीच्या उत्सवात साकारली जाईल.
आयुक्तालयाच्या दहा ठाण्याच्या हद्दीत गतवर्षी 492 सार्वजनिक मंडळे होती. त्या व्यतिरिक्त शहरालगत असलेल्या 40 छोट्या गावांमध्ये "एक गाव एक गणपती'च्या संकल्पनेला बळ मिळाले होते; तर ग्रामीण भागात अकराशे एक्कावन्न सार्वजनिक मंडळे असून, त्यापैकी दोनशे एक्केचाळीस गावांमध्ये "एक गाव एक गणपती' राहील. गणेशोत्सवामध्ये बळजबरीने वर्गणी वसूल करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पोलिसांनी आधीच दिला आहे. असे असले तरी, बऱ्याच मंडळाचे पदाधिकारी हे राजकीय पक्ष, संघटनांशी जुळलेले आहेत.
विविध शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना अनेक सार्वजनिक उत्सवप्रसंगी वर्गणी मागितली जाते. हा आकडा नेहमीच चार ते पाच अंकांपर्यंत जातो. अधिकारीसुद्धा विरोध होऊ नये म्हणून अशा प्रकारच्या पावत्यांचे सहज पैसे देतात. त्यामुळे अशा प्रकाराला आळा बसविणे अवघड होऊन जाते. गणपती मंडपाच्या ठिकाणी मूर्तीच्या सुरक्षेसाठी चोवीस तास सुरक्षा रक्षक ठेवावा लागेल, किंवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना ही जबाबदारी स्वीकारावी लागेल.
ज्वलंत विषयाच्या देखाव्यांना प्राधान्य
देशाच्या सुरक्षेसाठी भारताच्या शूर जवानांनी केलेला पराक्रम, ज्यात एअर स्ट्राईक, काश्‍मीरमधून रद्द केलेले 370 कलम, संसदेने पारित केलेला ट्रिपल तलाकमुळे महिलांमध्ये असलेला आनंद अशा ज्वलंत विषयावरील देखावे सार्वजनिक गणेशोत्सव काळात साकारल्या जाण्याची अधिक शक्‍यता आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
ज्या मोठ्या गणेशोत्सव मंडळाचे देखावे पाहण्यासाठी हजारोंची गर्दी होते. अशा ठिकाणी काही अघटित घटना घडू नये, पर्स, दागिने चोरीच्या घटनांवर लक्ष्य राहावे. यासाठी बऱ्याच मोठ्या मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे बंधन घालण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT