social media
social media 
विदर्भ

बाटलीत बाटली काचेची बाटली.. भाऊंचा फोटो बघून कोरोनाची...

भूषण काळे

अमरावती  : कोरोनामुळे २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा पुरेपूर फायदा नेटिझन्स सोशल मीडियावर घेताना दिसत आहेत. क्वारंटाईन डे फर्स्टपासून नेटिझनचे हे चॅलेंज सुरू झाले आहे. यानिमित्ताने दररोज निरनिराळे चॅलेंज सोशल मीडियावर बघायला मिळत आहेत.

सध्या सोशल मीडियावरील प्रत्येकच नेटिझन कवी झाला आहे. एकाहून एक दर्जेदार कवितांचा महापूर जणू सोशल मीडियावर आला आहे. सुरूवातीला जुने फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याचा ट्रेन्ड सुरू झाला. सध्या याच जुन्या फोटोवर कवितांचा मारा करून नेटिझन्स आनंद लुटत आहेत. प्रत्येकाने आपापल्या सोयीने कवितांचा स्टॉक स्वतःजवळ राखून ठेवला आहे.

सकाळ होत नाही तोच, या कवितांचा मारा केला जात आहे. सोशल मीडिया वापरणारे निरज कोकाटे, ऋग्वेद सरोदे, प्रणव लेंडे, प्रसाद पिदडी, शुभम चरडे, शुभम पांढरे, भूषण यादगिरे, निखील गाले, प्रणय मेहरे, गौरव कडू, आकाश वाघमारे, चेतन भामकर, वैभव डेहणकर, ऋग्वेद देशमुख, सुशांत पडोळे, अभिराज देशमुख, पंकज तायडे, अंकित जैन, वैभव बगणे, अनिकेत आखरे, अर्थव वंजारी, आदित्य साखरे, आदित्य घडेकर, संकेत कुलट, अवकाश बोरसे, वैभव भोरे, शुभम शेरकर, प्रद्युम्न पाटील, सागर लोंढे, स्वप्नील कडू, विक्की देवरे, पराग मोडक आदी युझर्स धूम करीत आहेत.    

काही निवडक कविता 

- काचेच्या ग्लासात गुलाबी शरबत..भाऊ म्हणते घरातल्या घरात मले नाही करमत.
- दू ध पाहिजे लोकांना..आपल्याला पाहिजे साय.. भाऊला पाहून पोरी म्हणतात हाय हुकू हाय हूक हाय हाय.
- फोटोवर कमेंट केली म्हणून भाऊ चिडले.. पण खरं सांगू का भाऊ.. तुमच्यासारख्या चॉकलेट बॉयमुळे पोरींचे दात किडले.
- भाऊच्या घरात मारबलची फरशी.. पोरी सगळ्या म्हणताहेत होणार मी सून ह्या घरची.
- गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा.. भाऊंचा फोटो पाहून पोरी लावतात केसात गजरा.
- भाऊंनी फोटो टाकल्यावर मार्केट मंद आणि धंदा बंद.. मुली सगळ्या म्हणतात.. आला गं माझा देवानंद.
- गावरान अंडी तळली तुपात.. काही तरी जादू आहे भाऊच्या रुपात.
- मटणाचा रस्सा आणि चिकन केले फाय.. भाऊंच्या प्रेमासाठी केले किती जणींनी ट्राय.
- रात्रीच्या वेळी आकाशात दिसतो मून.. भाऊंचा फोटो बघून पोरी करू लागल्या एकमेकांचा खून.
- शिकाल तर टिकाल आणि भाऊंच्या नादाला लागले.. तर पुणे स्टेशनला बरमुडे विकाल.
- एक आहे निफ्टी अन् दुसरा असतो सेन्सेक्स..वहिनी म्हणे देतो का गोल्ड रिंग की घालू मी बेंटेक्स.
- बाटलीत बाटली काचेची बाटली.. भाऊंचा फोटो बघून कोरोनाची फाटली.
- भाऊंनी बघितले तिच्याकडे वाकून.. अन् ते पयाली वावरात चपला तिथच टाकून.
- आपले भाऊ कधी गॉगल घातल्याशिवाय फोटो काढत नाही.. कारण भाऊचे डोळे बघितले की मुली वेड्या - झाल्याशिवाय राहत नाही.
- सगळ्या पोरी भाऊंचे लाडाने ओढतात गाल.. भाऊ पोरींना बघून म्हणतो कसा.. गाडी वाला आया घर से कचरा निकाल.

मुलींमध्ये साडीचा ट्रेन्ड 
एकीकडे युवक कवी झाले असताना दुसरीकडे मुलींमध्ये साडीचा ट्रेन्ड सुरू झाला आहे. साडीवरचा फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, यामध्ये मुलींना टॅग करून त्यांना साडीवरचा फोटो आपल्या वॉलवर टाकण्यासाठी चॅलेंज देण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT