Sheetal Amte commits suicide 
विदर्भ

Big breaking : बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

बालकदास मोटघरे

चंद्रपूर : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात, डॉ. विकास आमचे यांची कन्या व आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी सोमवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजता आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. मात्र, काही दिवसांपासून त्या तणावात होत्या असे काही दिवसांपूर्वी आमटे कुटुंबीयांनी सोशल माध्यमावर टाकलेल्या निवेदनात म्हटले होते.

आनंदवनात आमटे कुटुंबीयांचे निवासस्थान आहे. येथेच डॉ. शीतल आमटे-करजगी राहतात. महारोगी सेवा समितीच्या सीईओ म्हणून त्या काम बघत होत्या. सोमवारी त्यांनी आपल्याच निवासस्थानी हाताला इंजेक्‍शन टोचले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.

काही दिवसांपूर्वीच शीतल आमटे यांनी समाजमाध्यमावर एक चित्रफित जारी केली होती. त्यात आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर त्यांनी गंभीर आरोप केले होते. काही तासभरात नंतर चित्रफीत माध्यमातून हटवण्यात आली होती. दरम्यान, डॉ. शीतल आमटे यांनी केलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे जारी करण्यात आले होते.

डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांची स्वाक्षरी असलेल्या या निवेदनात डॉ. शीतल आमटे-करजगी या सध्या मानसिक ताण व नैराश्‍याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली होती. डॉ. शीतल आमटे यांनीही समाजमाध्यमावर जारी केलेल्या चित्रफितीतसुद्धा तशी कबुली दिल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले होते.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT