shiv sainik put board of vikrut mahan marg ka road name amravati administration Sakal
विदर्भ

Amravati News : रस्त्याचे नाव 'विकृत महान मार्ग'; शिवसैनिकांनी लावला फलक, प्रशासन झोपेतच

नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारींना केराचीटोपली दाखविण्याचा शिरस्ता मनपा - प्रशासनाकडून कायमच आहे.

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या तक्रारींना केराचीटोपली दाखविण्याचा शिरस्ता मनपा - प्रशासनाकडून कायमच आहे. शहरातील डॉ. पंजाबराव देशमुख चौक ते आरटीओ कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून वारंवार तक्रारी करूनसुद्धा प्रशासनाकडून त्याची कुठलीच दखल घेण्यात न आल्याने अखेर शिवसैनिकांनी या मार्गाला 'विकृत महान मार्ग, असे नामकरण करून तसा फलकही लावला आहे.

यासंदर्भात माजी नगरसेवक प्रदीप बाड यांनी सांगितले की, मागील अनेक 1 महिन्यांपासून डॉ. पंजाबराव देशमुख चौक ते आरटीओ कार्यालयापर्यंतच्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

खड्डे चुकविताना अनेकांचे अपघात या मार्गावर होत असतात. याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली असता पावसाळ्यात काही ठिकाणी खड्डे बुजविण्यात आले. मात्र पावसामुळे पुन्हा खड्डे तयार झाले. आता उन्हाळ्याचे दिवस असून याच दिवसात रस्त्यांची डागडुजी उत्तमप्रकारे करता येऊ शकते, यासाठी आम्ही मनपा प्रशासनाला पत्र दिले असून अद्याप त्याबाबत कुठलीही कार्यवाही झालेली नाही.

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसैनिकांनी 'विकृत महान मार्ग असे नामकरण केले असून तसे फलक लावले आहे, असेही श्री. बाजड यांनी सांगितले. विशेष म्हणजे, डॉ. पंजाबराव देशमुख चौक ते आर.टी.ओ. ऑफीस पर्यंत च्या अति दलीन्दर रोड चे नामांकन विकृत महान मार्ग मा. लोकप्रतीनिधी व प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेना रस्त्याच्या नामकरणाचा लावलेला फलक. शहरातील अन्य काही भागांतील सुद्धा खड्डेयुक्त रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT