Sanjay Rathod
Sanjay Rathod Sakal
विदर्भ

शिवसेनाप्रमुखांनी दिली विधानसभेची उमेदवारी - संजय राठोड

सकाळ वृत्तसेवा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मनाला भावले. त्यामुळेच मी शिवसेनेत आलो. शाखाप्रमुख ते मंत्रिपदापर्यंत माझा प्रवास झाला.

यवतमाळ - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मनाला भावले. त्यामुळेच मी शिवसेनेत आलो. शाखाप्रमुख ते मंत्रिपदापर्यंत माझा प्रवास झाला. 18 वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहिले. या काळात जिल्ह्यातील घराघरांत शिवसेना पोहोचविली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच संघटना व विधानसभेत संधी दिल्याचे शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

स्थानिक अभ्यंकर कन्या शाळेच्या प्रांगणात शनिवारी (ता.13) आयोजित सत्कार कार्यक्रमात श्री. राठोड बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडी सरकार बनविले होते. हे पूर्णपणे अनैसर्गिक सरकार होते. तीन चाकांचे ते सरकार व्यवस्थित चालत नव्हते. त्यामुळे ज्यांच्यासोबत विधानसभा निवडणुकीत आम्ही युती करून लढलो, त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे राठोड म्हणाले.

राजकारण म्हटले की, आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. मात्र, मला राजकीय आयुष्यातून उद्ध्वस्त करण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप केले गेलेत. ‘त्या’ 15 महिन्यांच्या काळात मी आणि माझ्या परिवाराने काय भोगले, हे आम्हालाच माहिती, असेही राठोड म्हणाले. ज्या झाडाला फळे असतात, त्याच झाडाला गोटे मारली जातात. बाभळीच्या झाडाला कुणीच गोटे मारीत नाहीत, असे म्हणत अप्रत्यक्षपणे आरोप करणार्‍यांचा राठोड यांनी समाचार घेतला. यावेळी दारव्हा-दिग्रस-नेर मतदारसंघातील संजय राठोड समर्थक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खुनी, बलात्कारी म्हणून मला पाहत होते

राजकारण खूप खालच्या स्तरावर गेले आहे. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आलेत. त्यामुळे खुनी, बलात्कारी म्हणून मला पाहत होते. त्यांची चौकशी व्हावी, म्हणूनच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्या आरोपात तथ्य नसून, आरोप बिनबुडाचे असल्याचे चौकशीत समोर आले. त्यामुळेच मला नागरिकांची सेवा करण्याची संधी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मिळाल्याचेही मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

दिग्रस येथे रविवारी आगमन

शिंदे-फडणवीस सरकारमधील कॅबिनेटमंत्री संजय राठोड रविवारी (ता.14) बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पोहरादेवी येथे दर्शन व धर्म परिषदेसाठी दिग्रसमार्गे जाणार आहेत. मंत्री झाल्यानंतर दिग्रस शहरात त्यांचे प्रथमच आगमन होत आहे. सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात राठोड यांचे आगमन होणार आहे. या ठिकाणी दिग्रस शहरासह तालुक्यातील समर्थकांतर्फे मंत्री संजय राठोड यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dahi Poha Recipe: सकाळच्या नाश्त्यात दही पोह्याचा घ्या आस्वाद ,जाणून घ्या रेसिपी

IPL 2024 MI vs LSG : शेवट गोड करण्याचे लक्ष्य; मुंबई - लखनौमध्ये आज लढत; रोहितला फॉर्म गवसणार?

बारावीचा 21 किंवा 22 मे रोजी तर दहावीचा निकाल 30 मेपूर्वी! ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल; जुलैमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा

SCROLL FOR NEXT