Jayant shiv sena rebel mla case If judiciary alive justice will prevail ncp Jayant Patil Gadchiroli esakal
विदर्भ

गडचिरोली : न्यायव्यवस्था जिवंत असल्यास न्याय मिळेल; जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा टोला

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : राज्यासह देशातही शिवसेनेतून फुटलेला शिंदे गट आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सध्याची एकूण परिस्थिती आता जनतेपासून लपून राहिलेली नाही. त्यामुळे देशात न्यायव्यवस्था जिवंत असेल, तर या प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना न्याय नक्की मिळेल, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र सरकारला लगावला.

जयंत पाटील म्हणाले की, शिवसेनेतून फुटलेल्या शिंदे गटातील एका आमदाराने आम्ही शिवसेनेच्या न्यायालयीन प्रकरणाला आणखी पाच वर्षे लांबवू शकतो, असे वक्तव्य केले होते. यावरून सध्या सत्ताधाऱ्यांनी न्यायव्यवस्थाही नियंत्रणात आणली आहे की काय, अशी शंका येत आहे. तरीही आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. म्हणून देशात खरेच न्यायव्यवस्था जिवंत आणि स्वतंत्र असेल, तर न्याय नक्की मिळेल. आपण जिल्ह्यात पक्षाचे सदस्य तयार करण्यासाठी व त्यांचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आखला आहे, असेही ते म्हणाले.

भूसंपादनाचा चारपट मोबदला देण्याची मागणी

यंदाच्या पुरामुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागात विशेषत: सिरोंचा तालुक्यात गंभीर अवस्था आहे. या तालुक्यातील गोदावरी नदीवर तेलंगण सरकारने निर्माण केलेल्या महाकाय मेडीगड्डा धरणामुळे सिरोंचाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने येथील रखडलेले भूसंपादनाचे काम चार पट दराने मोबदला देऊन लवकर पूर्ण करावे आणि नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

Marathwada News : “साहेब, आम्हाला पण भीती वाटते!” पीक वाचवायचं की जीव; निल्लोड परिसरात अंधारात गहू भरणी करताना शेतकरी धोक्यात!

SCROLL FOR NEXT