file photo 
विदर्भ

Maharashtra vidhansabha 2019 जागेसाठी शिवसेनेचे दबावतंत्र मेळावे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर :  युती झाली तरी नागपूर जिल्ह्यात भाजप जागा सोडण्याची शाश्‍वती दिसत नसल्याने शिवसेनेच्या वतीने मेळावे घेऊन दबाबतंत्राचा वापर केला जात आहे. मंगळवारी एकाच दिवशी तीन मेळावे घेऊन शिवसेनेने जागेसाठी आक्रमक असल्याचे संकेत भाजपला दिले आहेत.
मंगळवारी पश्‍चिम नागपूर आणि उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघ तसेच ग्रामीणमधील सावनेर मतदासंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात आले. उद्या बुधवारी पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघा मेळावा आयोजित केला आहे. राज्यात सुमारे 25 वर्षे भाजप-सेनेची युती होती. सेनेचे शहरातील दक्षिण नागपूर तर ग्रामीणमध्ये रामटेक आणि काटोल मतदारसंघ होते. युती तुटल्यानंतर भाजप-सेना आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढली. 25 वर्षे कधीच जिंकता आली नसलेली दक्षिण नागपूर आणि काटोल विधानसभा भाजपने जिंकली. एवढेच नव्हे, तर रामटेकमध्ये हॅट्‌‌‌‌‌‌‌ट्रिक नोंदवणारे शिवसेनेचे आमदार आशीष जयस्वाल यांनाही भाजपच्या मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पराभूत केले. यानंतर भाजप-सेना पुन्हा एकत्र झाली. लोकसभेत युती झाली. त्यामुळे विधानसभेत जागा वाटपाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जिंकलेल्या जागा सोडण्यात येऊ नये, असा भाजपच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. विशेष म्हणजे शिवसेनेसाठी सोडलेल्या सर्वच जागांवर भाजपचे आमदार आहेत. सावनेरमध्ये भाजपचे उमेदवार नसल्याने शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यामुळे ही जागा शिवसेनेला हवी आहे. मेहनतीने जिंकलेल्या जागा कशा सोडायच्या, असा प्रश्‍न भाजपला पडला आहे. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्याने ते सहजासहजी जागा सोडणार नाही याची चिंता शिवसेनेला सतावत आहे. त्यामुळे मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे समजते.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांनी दक्षिण नागपुरातून लढण्याची इच्छा दर्शवली आहे. याशिवाय माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, किशोर कुमेरिया तसेच किरण पांडव यांनीही येथून दावा केला आहे. विशेष म्हणजे जाधव यांनी मागील निवडणूक हिंगणा मतदारसंघातून लढली होती. पूर्व नागपूरही सेनेने मागितले आहे. सावनेरमधून सुनील केदार यांच्याविरोधात किशोर कन्हेरे लढण्याची तयारी करीत असल्याचे समजते. पक्षाचे अस्तित्व राखण्यासाठी शहर आणि जिल्ह्यात शिवसेनेला जागा हव्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भव्य ड्रोन शो

Kannad News : हैदराबाद गँझेटीयरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन केली मागणी

SCROLL FOR NEXT