shivsena agitation against raosaheb danve in teosa of amravati 
विदर्भ

Video : तिवसा येथे सेनेचे निषेध आंदोलन, रावसाहेब दानवेंच्या फोटोला फासले काळे

प्रशिक मकेश्वर

तिवसा ( जि. अमरावती ) : भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ व केंद्र सरकारच्या दरवाढी विरोधात आज तिवसा शहरात शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी दानवे यांच्या फोटोला काळे फासण्यात आले. तसेच शहरातील शिवसैनिकांनी भाजप विरोधात नारेबाजी करत निषेध केला. 

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला राज्यातून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असताना भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीच्या शेतकरी आंदोलना मागे चीन व पाकिस्तानचा हात आहे, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे तिवसा येथे जुन्या नगरपंचायत कार्यालयासमोर शिवसेनेचे वतीने रावसाहेब दानवे यांच्या फोटोला काळे फासण्यात आले.

पेट्रोल व डिझेल दरवाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तत्काळ दरवाढ कमी करावी तसेच भाजपाविरोधात शिवसेनेचे वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. यावेळी शिवसैनिकांनी रावसाहेब दानवे यांच्या फोटोला काळे फासून निषेध केला.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्याम देशमुख, आशिष धर्माळे, माजी नगरसेवक प्रदीप गौरखेडे, धनराज थूल, शहर प्रमुख अमोल पाटील, प्रकाश पडोळे, रुपेश पुरी, अजय आमले, सतीश देशमुख, रमेश वानखडे यासह शिवसैनिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crop Insurance: दुष्काळ जाहीर झाला! आता पीक विम्याचे पैसे किती मिळणार? रक्कम कशी ठरणार, पाहा संपूर्ण गणित

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा अपघात! थांबलेल्या टँकरला धडकून कारचा चुराडा, एकाचा मृत्यू

Dattatray Bharne Drought Relief : महाराष्ट्रातील दुष्काळावर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले? किती टप्प्यात मदत करणार?

पुण्यात पोलिसाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं, PMPLच्या बस डेपोत आढळला मृतदेह; ३ दिवसांपासून होते बेपत्ता

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

SCROLL FOR NEXT