Shivsena leader prataprao Jadhav sworn in as union minister in modi government Buldhana Raksha Khadse 
विदर्भ

Modi Oath Ceremony : प्रतापराव जाधव यांच्या रूपाने जिजाऊंच्या जिल्ह्याला केंद्रीय मंत्री पदाचा बहुमान!

prataprao Jadhav as union minister : प्रतापराव जाधव हे शिवसेनेचे तीन वेळा आमदार एक वेळा राज्यमंत्री आणि 2009 पासून सलग चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा, ता. ९ : राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्माने पावन झालेल्या बुलढाणा जिल्ह्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय मंत्री पदाचा बहुमान प्रतापराव जाधव यांच्या रूपाने मिळाला आहे.

प्रतापराव जाधव हे शिवसेनेचे तीन वेळा आमदार एक वेळा राज्यमंत्री आणि 2009 पासून सलग चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. मेहकर सारख्या ग्रामीण भागात आपली राजकीय कारकीर्द सुरू करून सातत्य मेहनत राजकीय चातुर्य संघटन कौशल्य या बळावर त्यांनी शिवसेनेतील बहुतांश पदांवर यशस्वीरित्या काम केलं आहे.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी नंतर एकनाथ शिंदे यांना प्रतापराव जाधव यांनी समर्थ साथ दिली व जिल्ह्यातील डॉ. संजय रायमुलकर व संजय गायकवाड हे दोन्हीही आमदार शिंदे यांच्या पाठीशी उभे करण्यात प्रतापरावांचा मोलाचा वाटा होता. याचा विचार निश्चितच मंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये अनेक चेहरे असतानाही प्रतापराव यांची वर्णी लागण्यात झाला आहे. औद्योगिक मागासलेपणाचा शिक्का लागलेल्या बुलडाणा जिल्ह्याला या केंद्रीय मंत्री पदाचा उपयोग होऊन जिल्ह्याच्या पदरी भरघोस काहीतरी पडेल, अशी अपेक्षा जिल्हावासी व्यक्त करीत आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात दोन केंद्रीय मंत्रीपदे?

भौगोलिक दृष्ट्या विचार करता बुलडाणा जिल्ह्याला खासदार प्रतापराव जाधव व खासदार रक्षाताई खडसे यांच्या रूपाने दोन केंद्रीय मंत्रीपदे मिळाली आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बुलडाणा जिल्ह्याची विभागणी बुलढाणा व रावेर अशा दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये झालेली आहे.

जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, सिंदखेडराजा, खामगाव, जळगाव जामोद व मेहकर हे पाच विधानसभा मतदारसंघ बुलडाणा लोकसभेमध्ये येतात. मात्र मलकापूर व नांदुरा हे दोन तालुके असलेला मलकापूर विधानसभा मतदारसंघ नजीकच्या रावेरमध्ये येतात. यावेळी रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे यांना देखील केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याला दोन केंद्रीय मंत्रिपदे मिळालेली आहेत, एवढे निश्चित!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT