विदर्भ

Buldhana Loksabha: बुलडाणा लोकसभेसाठी ठाकरे-शिंदेंची लढत; ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकरांना उमेदवारी?

लोकसभा निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये घडामोडींना वेग आला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

बुलडाणा : लोकसभा निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांमध्ये घडामोडींना वेग आला आहे. त्यानुसार, यंदा बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यासाठी ठाकरे गटाकडून जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

21 आणि 22 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत, यावेळी खेडेकरांच्या नावाची घोषणा होऊ शकते. (Shivsena Thackeray Shinde faction fight for Buldhana Loksabha Narendra Khedekar will be Thackeray candidate)

उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानी बुलडाणा लोकसभा मतदारसंघाची आज बैठक पार पडली. या बैठकीत संपर्कप्रमुख जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नरेंद्र खेडेकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित केल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.

महाविकास आघाडीमध्ये बुलडाणा लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेना ठाकरे गटाकडं असणार आहे. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटात असलेले प्रतापराव जाधव हे सध्या विद्यमान खासदार आहेत. (Latest Marathi News)

नरेंद्र खेडेकर हे या आधी जिल्हा परिषद अध्यक्ष, शिवसेना जिल्हाप्रमुख होते. ते सध्या बुलडाणा जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळं बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. या लोकसभा मतदारसंघांमध्ये बुलडाणा, चिखली, खामगाव, सिंदखेड राजा, मेहेकर, जळगाव जामोद हे विधानसभा मतदारसंघ येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT