Shri Sant Gajanan Maharaj Palkhi Ceremony return from Pandharpur 
विदर्भ

बुलडाणा : ‘श्रीं’चा पालखी सोहळा परतला स्वगृही

संतनगरीत फुलला भक्तांचा मेळाः सर्वत्र गण गण गणांत बोतेचा गजर; जल्लोषात स्वागत

दिनेश महाजन

शेगाव : विठ्ठल-रुखमाईच्या दर्शनासाठी अश्व, गज व मेणासह श्री क्षेत्र पंढरपूरला गेलेला श्री संत गजानन महाराजांचा पायदळ पालखी सोहळा आज रोजी सकाळी स्वगृही परतला. त्यानिमीत्याने ‘श्रीं’च्या स्वागतासाठी लाखो हजारोच्या संख्येने भाविक भक्तांनी संतनगरीत हजेरी लावली होती. सकाळी ११ वाजता सुमारास श्रींच्या पालखीचे शेगाव शहरात आगमन झाले. स्थानिक गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर ‘श्रीं’च्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात येवून विधीवत पूजन करण्यात आले. अनेकजण खामगाव येथून ‘श्रीं’च्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.

त्यानंतर ‘श्रीं’चा पालखी सोहळा गजानन वाटीका येथे विश्रांतीकरता थांबला. तेथे महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. त्यानंतर दुपारी १ वाजता गजानन महाराज वाटीकेपासून पालखी सोहळा ‘श्रीं’च्या मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाला. हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते. तसेच शहरात जागोजागी पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. खामगावपासून शेगावपर्यंत रस्त्यावर अनेकजागी पायदळ वारकऱ्यांसाठी चहापाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.

वाटीकेपासून सुरू झालेली पालखी सोहळ्याची मिरवणूक रेल्वे स्टेशन मार्गाने, महाराजा श्री अग्रसेन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गाने स्वगृही पोहचली. मंदिरात महाआरती करून श्रींच्या पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली. शहरात होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने आज पहाटेपासूनच खामगाव रस्त्यावरील वाहतुक जवळा तसेच खेर्डा जलंब मार्गे वळविण्यात आली होती. तसेच शहरातील मुख्य मार्गाची वाहतुकही वळविण्यात आली होती. सायंकाळी पालखी सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मंदिराकडे मार्गस्थ झाल्यानंतर शहरातील वाहतूक पुर्ववत सुरू करण्यात आली. एसटी महामंडळाकडून भक्तांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. कायदा आणि सुरक्षेच्या दृष्टिने पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

पहाटेपासूनच भाविकांची वर्दळ

‘श्रीं’च्या पालखी सोहळ्याच्या आगमनप्रित्यर्थ हजारो भाविक भक्त खामगांव येथून शेगावपर्यंत पायदळ वारी करतात. दरवर्षी पायदळ वारी करणाऱ्या भक्तांमध्ये वाढ होत असून यावर्षीही १७ कि.मी.चा शेगाव-खामगांव रोड भाविक भक्तांनी फुलून गेला होता. पायदळ वारीमध्ये महिला, पुरूष, युवक व लहान मुलांची सुध्दा उपस्थिती होती. पहाटेपासूनच या रस्त्यावरून वाहतूक बंद करण्यात आली होती.

रिंगण सोहळा उरला आकर्षण

श्रींच्या पालखीची नगरपरिक्रमासाठी दुपारी १ वाजता वाटिका येथून सुरुवात झाली. सायंकाळी श्रींच्या मंदिरात भक्तांच्या उपस्थितीत वारकऱ्यांचा टाळ मृदंगाच्या तालावर श्रींचा नामघोष विठ्ठल व ज्ञानोबा तुकारामनामाचा नामघोष करीत श्रींची पालखीचे स्वागत होवून सायंकाळी श्रींच्या मंदिरात पालखी सोहळा पोहोचलला. यावेळी आकर्षक रिंगण सोहळा पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय महिला संघाची 'ती' कृती अन् R Ashwin ने पुरुषांच्या संघाचे काढले वाभाडे; म्हणाला, ते फक्त प्रसिद्धीसाठी बाता मारतात, पण..

Pune News: पुणे जिल्ह्यात भीतीचा अंत! शिरूरमधील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश जारी

Latest Marathi News Live Update : एक दिवस राज्य माझा ताब्यात द्या, ईव्हीएमचा घोळ बाहेर काढतो - आमदार उत्तम जानकर

Akkalkot News: 'अक्कलकोट तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींना मिळणार स्वतंत्र इमारत'; एक कोटी पाच लाख निधी मंजूर; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा पुढाकार

Mumbai News : हाताला मेहंदी लावली म्हणून विद्यार्थीनीला वर्गातून बाहेर काढलं, पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार....

SCROLL FOR NEXT