death 
विदर्भ

#Lockdown : किती हे दुर्दैव, बहिणीला घेता आले नाही भावाचे शेवटचे दर्शन 

संदीप रायपुरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर)  : भावाचा मृत्यू झाल्याची बातमी समजली. अन् ती स्तब्धच झाली. कोरोनाने लॉकडाऊन झालेले. अशात तिने पायीच भावाच्या गावाला निघण्याचा निर्णय घेतला. काही अंतरावर गेल्यावर पोलिसांनी अडवले. आकांडतांडव करून तिने भावाचा मृत्यू झाल्याने अंतिम दर्शनासाठी जाऊ द्यावे, अशी विनंती केली. तिचे दु:ख पोलिसांनीही कळले पण त्यांचाही नाईलाज होता. तब्बल दोन तास विनवणी करूनही कुणी मानयला तयार नव्हते. तिकडे बहीण भावाच्या अंत्यसंस्कारासाठी येणारच म्हणून सारेच थांबलेले. पण सारे प्रयत्न निष्फळ ठरले. अन् केवळ वीस किलोमीटर अंतरावर असूनही बहिणीला भावाचे अंत्यदर्शन घेता आले नाही. शनिवारी (ता. २९) हा हृद्यद्रावक प्रसंग घडला.

गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील प्रकाश ऊराडे यांचा काल सकाळच्या सुमारास मृत्यू झाला. कोरोनाच्या सावटात झालेल्या मृत्यूनंतर कुटुंबीयांसमोर मोठे संकट निर्माण झाले. मृत्युची बातमी आप्तेष्टांपर्यत पोहचविण्यात आली. प्रकाश उराडे यांची गोपिका दुर्गै ही बहीण आष्टी येथे असते. तिला भावाच्या मृत्यूची बातमी समजली. आष्टी ते गोंडपिपरीचे अंतर केवळ वीस किलोमीटर आहे. तिने गोजोलीला जाण्याचा निर्णय घेतला. पण लॉकडाऊनमुळे वाहने बंद होती. अशात दुसरा पर्याय नसल्याने तिने पायीच निघण्याचा निर्णय घेतला. काही अंतरावर गेल्यानंतर आष्टी पोलिसांनी अडविले. विचारपूस केल्यानंतर भावाच्या मृत्यूची दुर्दैवी बातमी तिने सांगितली.
गळा सुकला....तरीही 100 तासांपासून तो देतोय जागृतीचा संदेश

भावाचा मृत्यू झाल्याने अंतिम संस्कारासाठी जाऊ द्यावे, अशी विनंती पोलिसांना केली. आष्टीचा चेकनाका पोष्ट हा आंतरजिल्हा सीमेवर आहे. यामुळे एका बहिणीच्या वेदना समजूनही त्यांनी तिला समोर जाऊ दिले नाही. तब्बल दोन तास ती नाक्यावर होती. पण समोर जाणे शक्यच नव्हते.

भावाच्या अंतिम दर्शनासाठी बहीण येणार यासाठी अख्खे कुटुंब वाट बघत होते. शेवटी सारेच पर्याय हटल्याने व येणे शक्य नसल्याचा संदेश आल्याने प्रकाश उराडे यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोरोना व्हायरसने अख्ख्या जगभर थैमान घातले आहे. सामान्यांचे तर यामुळे कंबरडेच मोडले आहे. अशात केवळ वीस किलोमीटर अंतरावर भावाचे गाव असूनही त्याच्या अंतिम संस्काराला जाऊ न शकल्याची पाळी कोरोनाने आणली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

SCROLL FOR NEXT