washim 1.jpeg 
विदर्भ

...अन् त्यांनी रस्त्यावर काढल्या उठाबशा !

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रामुख्याने गर्दीमुळे होतो. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घरीच बसून राहण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, विनाकारण घराबाहेर पडणार्‍या तरुणांना पोलिसांनी उठाबशांची शिक्षा सुनावली. त्यामुळे शहरात विनाकारण चक्कर मारणार्‍या तरुणांवर संचारबंदीचा धाक निर्माण झाला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने शासन, प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या ठिकाणांवर गर्दी होणार नाही, याकडे पोलिस प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. मात्र, असे असतानाही काही युवक सकाळी आठ ते बाराच्या सुमारास विनाकारण घराबाहेर पडतात. दुचाकी वाहनावरून या चौकातून त्या चौकात मिरवण्याचा प्रयत्न करतात. 

अशा वाहनांवरून फिरणार्‍या तरुणांची चौकशी केली जात आहे. खरोखर कामानिमित्त बाहेर पडणार्‍यांना सोडून दिले जात आहे. मात्र, जे विनाकारण घराबाहेर पडतात त्यांना चौकाचौकात थांबवून एकतर लाठीचा प्रसाद दिल्या जातो. नसता उठाबशा काढण्याची शिक्षा देऊन पुन्हा विनाकारण न फिरण्याची समज दिल्या जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाचा संसर्ग स्थिरावला
जिल्ह्यात कोरोना बाधित एक रुग्ण आहे. तसेच इतर सर्व संदिग्ध रुग्णांच्या ‘स्वॅब’चे नमुने देखील ‘निगेटिव्ह’ आले. त्यांतर सदरील कोरोना बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांचे ‘स्वॅब’ नमुने देखील ‘निगेटिव्ह’ आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग स्थिरावल्याचे दिसून येत आहे. ही बाब पाहता आता कोरोना रुग्णाच्या 14 दिवसानंतर व 24 तासानंतर होणार्‍या तपासणी अहवालाकडे आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

अशी आहे स्थिती....
गृह अलगीकरण................23
संस्थात्मक विलगीकरण.....17
अलगीकरण कक्ष...............01
आत्तापर्यंत घेतलेले नमुने...27
पॉझिटिव्ह अहवाल.............01
निगेटिव्ह अहवाल..............26
अहवाल अप्राप्त.................00

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT