lockdown in washim.jpg 
विदर्भ

चौथ्या लॉकडाऊनमध्ये अशी राहील परिस्थिती; या जिल्ह्यात पासेसना 31 मे पर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : जिल्ह्यात 31 मे 2020 पर्यंत संचारबंदी वाढविण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांनी दिले असून या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. यापूर्वी, 3 मे रोजीच्या आदेशानुसार परवानगी दिलेल्या आस्थापना व दुकानेच जिल्ह्यात यापुढेही सुरू राहणार आहेत. त्यांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, पुढील आदेशापर्यंत हीच वेळ कायम राहणार आहे.

आस्थापना, दुकानांमध्ये काम करणार्‍या कर्मचारी, मजुरांना यापूर्वी देण्यात आलेल्या पासेसना 31 मे 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून त्यांना नव्याने पासेस काढण्याची आवश्यकता नाही, असे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी मोडक यांनी कळविले आहे.

खालील सेवा राहणार प्रतिबंधित
सुरक्षेच्या उद्देशाशिवाय रेल्वेने सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतुकीवर बंधने राहणार असून कोणत्याही रेल्वेने प्रवासी वाहतूक करता येणार नाही. अधिकृत परवानगीशिवाय परराज्यातून वाशीम जिल्ह्यात व वाशीम जिल्ह्यातून परराज्यात प्रवासाच्या वाहतुकीला पूर्णपणे बंदी असेल. सार्वजनिक व खासगी प्रवासी वाहतुकीची सर्व साधने, रिक्षासह बसेस बंद राहतील. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस दिलेल्या वेळत जिल्हांतर्गत सुरू राहतील. सर्व शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस इत्यादी बंद राहतील. आरोग्य खात्याच्या, गृह खात्याच्या व इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी वगळता इतर सर्व व्यक्तींसाठी आदरातिथ्याची सेवा पूर्णपणे बंद राहील. सदरचा मुद्द्दा अडकलेल्या व्यक्तींसाठी, प्रवाशांसाठी, पर्यटकांसाठी लागू राहणार नाही. 

सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, जिम्नॅशियम, स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क, बार, असेंब्ली हॉल पूर्णपणे बंद राहतील. सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व मेळावे यावर पूर्णपणे बंदी राहील. सर्व धार्मिकस्थळे, प्रार्थनास्थळे सामान्य व्यक्तींसाठी बंद राहतील. कोणत्याही परिस्थितीत धार्मिक सभा, धार्मिक परिषद, धार्मिक मेळावे भरविता येणार नाहीत. केश कर्तनालय, ब्युटीपार्लर, चहाच्या टपर्‍या, पानटपर्‍या, उपहारगृह, ढाबे पूर्णपणे बंद राहतील. दारूची दुकाने सुरु ठेवण्यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क शाखेमार्फत 5 मे 2020 रोजी निर्गमित करण्यात आलेले आदेश यापुढेही कायम राहतील.

 
फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आवश्यक
परवानगी दिलेल्या आस्थापना, दुकाने याठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होणे आवश्यक असून याकरिता आस्थापना, दुकानासमोर सहा फुटाच्या अंतराने मार्किंग करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनाधारक, दुकानदार यांची राहील. तसेच यामध्ये सेवा देताना मास्कचा वापर, वैयक्तिक स्वच्छता, सॅनिटायझरचा वापर बंधनकारक राहील. दुकानामध्ये अथवा आस्थापनामध्ये एकाचवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती असणार नाहीत, याची खबरदारी दुकानदार, आस्थापनाधारकाने घेणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banking Update: बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद! कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?

ऑक्टोबरमध्ये येणार १०० टक्के इथेनॉलवर चालणारी कार, पेट्रोलचा खर्च फक्त २५ रुपये लीटर; गडकरींचा मोठा दावा

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २६ सप्टेंबर २०२६ ते २ ऑक्टोबर २०२६ - मराठी राशी भविष्य

Aditya Thackeray : हे सरकार निर्दयी! आदित्य ठाकरे यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT