विदर्भ

सहा जणांचा जामीन नाकारला; रेमडेसिव्हिर काळाबाजार प्रकरण

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शहरात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनच्या (Remedivir injection) काळाबाजारप्रकरणी न्यायालयाने (Court) सहाही संशयित आरोपींचा बुधवारी (ता. १९) जामीन नाकारला. डॉ. पवन दत्तात्रेय मालुसरे, डॉ. अक्षय मधुकर राठोड, पूनम भीमराव सोनोने, शुभम प्रमोद सोनटक्के, शुभम शंकर किल्लेकर व विनीत अनिल फुटाणे आदींचा अमरावती न्यायालयाने जामीन नाकारला. असे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक व गुन्हे शाखेचे प्रभारी सहायक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे यांनी सांगितले. (Six were denied bail Remdesivir black market case)

फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात याप्रकरणी नमूद सहा व्यक्तीरिक्त अन्य एक, अशा सात जणांविरुद्ध नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी एक जण क्वारंटाइन सेंटरमध्ये आहे. उर्वरित सहापैकी विनीत फुटाणे न्यायालयीन कोठडीअंतर्गत मध्यवर्ती कारागृहात आहे. डॉ. मालुसरेंसह पाच जणांना न्यायालयाने तात्पुरता अंतरीम जामीन मंजूर केल्यामुळे ते बाहेर होते. अंतिम जामीन रद्द करावा, यासाठी गुन्हे शाखेच्या वतीने न्यायालयात बुधवारी से दाखल करण्यात आला. सुनावणी होऊन न्यायालयाने पाच जणांना जामीन नाकारला, असे तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

रेमडेसेव्हिरच्या काळाबाजार प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. अंतिम जामीन नाकारल्यानंतर चौकशीसाठी पुन्हा संबंधितांना ताब्यात घेण्याकरिता कायदेशीर बाबी तपासून पुढील कारवाई केली जाईल.
- शिवाजी बचाटे, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, अमरावती

(Six were denied bail Remdesivir black market case)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT