daru vikri 
विदर्भ

Video : कमालच झालं की, विक्रीसाठी आणलेल्या भांड्यांतून निघाले हे... 

प्रमोद काकडे

चंद्रपूर : अवैध दारूची विक्री करण्यासाठी नवनवी शक्कल दारू तस्कर लढवित असल्याचे आपण रोजच वृत्तपत्रांमधून वाचतो. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे एका दारू तस्कराने दारू विकण्यासाठी वापरलेली शक्कल पोलिसांनाही चक्रावून सोडून गेली. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीच्या अंमलबजावणीला येत्या मार्च महिन्यात पाच वर्षे पूर्ण होत आहे. असे असले तरी जिल्ह्यातील दारू तस्करी विनाअडसर सुरूच आहे. पोलिसांनी कित्येक मोहिमा व कडक नाकाबंदी करूनही लाखो लिटर दारू चोरट्या मार्गाने शहर व जिल्ह्यात पोहोचत आहे. 

भांड्यांमध्ये लपवून दारूची विक्री 

चंद्रपूर जिल्ह्यातील दारू विक्रीचा एक वेगळा नमुना वरोरा शहरातील बोर्डा भागात बघायला मिळाला. घरोघरी, गल्लीबोळात भांडे विक्री करण्याच्या बहाण्याने निघालेल्या एका विक्रेत्याजवळ पोलिसांना 50 हजार रुपयांच्या देशी दारूचा साठा सापडला. आपल्या दुचाकी वाहनावर भांडे रचून गल्लीबोळात भांड्यांऐवजी त्यात लपवून ठेवलेली दारू विकली जात असे. पोलिसांना याची कुणकुण लागताच त्यासाठी सापळा रचण्यात आला. पोलिसांनी या आरोपीला वरोरा पोलीस ठाण्यात आणल्यावर त्याच्या भांड्यांमध्ये लपवलेला दारूसाठा बाहेर काढताच पोलिसांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला. 

50 हजारांची देशीदारू जप्त

एक- दोन नव्हे तर चक्क 50 हजार रुपयांची देशीदारू या भांड्यांमधून जप्त करण्यात आली. पोलिसांनी हा दारूसाठा मुद्देमालासह ताब्यात घेतला असून अजय मथेवार या आरोपीला अटक केली आहे. त्याने हा दारूसाठा कुठून आणला व विक्री कुणाकडे करणार होता या सर्वांचा पोलीस छडा लावत आहेत. चंद्रपूरच्या गल्लीबोळात "भांडे घ्या भांडे'च्या आडून "दारू घ्या दारू' असेच या विक्रेत्यांना म्हणायचे आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu-Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचा कमांडर लतीफ भट चकमकीत ठार

'रामायण'ची गाणी हिट का झाली नाहीत? जावेद अख्तर यांचे उत्तर; म्हणाले, 'मी चांगला रायटर आहे...'

Bhide Bridge: पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी बंद; १९ नोव्हेंबरपासून पादचारी पुलाचे काम सुरू… पर्यायी मार्ग कोणते?

Madhya Pradesh: उज्जैनमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये; पुष्पवृष्टी करून मुख्यमंत्र्यांनी केला सन्मान

Latest Marathi News Live Update : अक्कलकोट-स्वारगेट एसटी बसला अचानक आग, ५० प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT