file photo 
विदर्भ

दारूविक्रेत्यांनी लढविली शक्कल; कांद्याच्या पोत्याआड केली दारूची तस्करी, दोघांना अटक

रूपेश खैरी

वर्धा : दारू तस्करीसाठी अनेकांकडून विविध क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. कोणत्याही प्रकारची कुणकुण लागू नये म्हणून दारूविक्रेते नवीन शक्कल ळडवीत आहेत. असाच प्रकार येथे पुन्हा उघड झाला. यात कांद्याच्या पोत्याआड दारूची तस्करी करताना दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून दारूसह एकूण १२ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दोघांना केली अटक

मंगेश मदन अहेरवाल (वय २३) रवीदासनगर, वॉर्ड नं. ४, मुर्तीजापूर (जि. अकोला), बाबूलाल सिद्धार्थ सदानशिव (वय ३०) रा. लंगापूर पोई, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला, अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्‍तींची नावे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे दोघे कांद्याच्या पोत्याआड दारूसाठा भरून चंद्रपूर येथे जाणार होते, अशी कबुली या आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

हिंगणघाट पोलिसांनी रचला सापळा

हिंगणघाट येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना एका मालवाहू (क्र. एमएच १० सीए ६१४९) वाहनातून दारूसाठा चंद्रपूर येथे जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून नंदोरीकडे जाणाऱ्या मार्गावर माहितीत असलेल्या वाहनाची झडती घेतली. त्या वाहनात कांद्यांच्या पोत्याआड मोठ्या प्रमाणात दारू तस्करी केली जात असल्याचे आढळून आले.

१२ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

यात पोलिसांनी देशी दारूचे १२० खोके, ३०० किलो कांदे, बोलेरो गाडी, एक मोबाईल व वाहन असा १२ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे, ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण पथकाचे हवालदार शेखर डोंगरे, नीलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर यांनी केली आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: बंडखोरी थोपवण्यात भाजप अपयशी! भांडुप, विक्रोळीतील दोन बंडखोर शिवसेनेविरोधात लढणार

Video: 'भारतीय फुटबॉलला वाचवा, आम्हाला खेळायचंय...', सुनील छेत्रीसह फुटबॉलपटूंची FIFA कडू कळकळीची विनंती

Delivery Partner Income : ऑफिसच्या नोकरीपेक्षा जास्त डिलिव्हरी बॉयची कमाई? जाणून घ्या, नेमकी वस्तूस्थिती!

Dhule Municipal Election : धुळ्यात २४ तास 'हाय व्होल्टेज ड्रामा'; भाजपचा बिनविरोधचा प्रयत्न विरोधकांनी उधळला!

Municipal Election: महापालिका निवडणुकीत खेळीमेळी की खेळी? बिनविरोध विजयांमागचं सत्य आयोग शोधणार; अहवाल मागवला, आता चौकशी होणार!

SCROLL FOR NEXT