blood donation 
विदर्भ

कोरोनारुपी राक्षसाला न घाबरता त्या योद्ध्यांनी सुरूच ठेवला रक्तदानाचा महायज्ञ

सुधीर भारती

अमरावती ः कोविडच्या बिकट परिस्थितीत जिथे घरातून बाहेर पडण्याची सर्वांना भीती वाटत होती, अशा परिस्थितीत रुग्णांना रक्ताची चणचण भासू नये यासाठी मागील पाच महिन्यांपासून शहरातील समाजसेवी संस्था तसेच समाजसेवकांनी रक्तदानाचा महायज्ञ अहोरात्र पेटता ठेवण्यात यश प्राप्त केले आहे. 

साधारणपणे मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. सुरुवातीला रुग्णसंख्या अतिशय मर्यादित असली तरी नागरिकांमध्ये या आजाराविषयीचे भय अधिक होते. त्यातच लॉकडाउन, संचारबंदी यामुळे वातावरण काळजीमय झाले होते. अशातच नागरिकसुद्धा घराबाहेर पडण्यास तयार नव्हते. त्यात रक्तदानासाठी कुणीच समोर येत नसल्याने रक्तपेढ्यांमधील रक्तदेखील संपले.

मात्र, रक्तदान समितीसह अन्य सामाजिक संस्थांचे पदाधिकारी हिमतीने समोर आले आणि कोरोनाशी दोन हात लढा देत या बहाद्दरांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन सुरू केले. मागील पाच महिन्यांत डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्यातून विविध राजकीय व सामाजिक संस्थांच्या मदतीने रक्तदान समितीकडून विविध रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. 

पाच महिन्यांच्या कालावधीत साधारणपणे ६५ ते ७० शिबिरांचे यशस्वी आयोजन करून जवळपास तीन ते साडेतीन हजार बाटल्या रक्तसंकलन करण्यात समितीने यश प्राप्त केले. रक्तदान समितीचे पदाधिकारी महेंद्र भुतडा, अजय दातेराव, उमेश पाटणकर, श्‍याम शर्मा व अन्य सदस्यांचे अमूल्य योगदान या शिबिरांमध्ये लाभले. विशेष म्हणजे, रक्तदानासोबतच प्लाझ्मा दानासाठीसुद्धा रक्तदान समितीसोबतच ॲड. शोएब खान व त्यांची चमू मागील काही महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न करीत आहे. 

रक्तदानासोबतच आज प्लाझ्मा डोनर्सची गरज आहे. कोविड रुग्णांवरील उपचारासाठी प्लाझ्मा दानदाते मिळविण्याचा प्रयत्न रक्तदान समिती करीत आहेत. काही लोकांना समितीच्या माध्यमातून प्लाझ्मा मिळवून देण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत प्लाझ्मा दानदाते मोठ्या संख्येने उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- महेंद्र भुतडा, अध्यक्ष, रक्तदान समिती. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT