ैSoldiers are standing between corona and people on border  
विदर्भ

कोरोनाला रोखण्यासाठी रखरखत्या उन्हात जवानांचा खडा पहारा

सकाळ वृत्तसेवा

सिरोंचा (गडचिरोली) : तालुक्‍याच्या दक्षिणेला तेलंगणा आणि पश्‍चिमेला छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमा असल्याने या आंतरराज्यीय नाक्‍यावर पोलिस जवानांचा रात्रंदिवस खडा पहारा असून तीव्र उन्हाचे चटके खात ते कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

देशासह प्रत्येक राज्यात कोरोना या महाभयंकर साथरोगामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. हा साथरोग केव्हा आणि कोठून येईल, याचा नेम नसल्याने प्रशासनाकडून सतर्कता बाळगली जात आहे. जिल्ह्याच्या काही भागात बाहेरून येणाऱ्या नागरिकांना गावात गावबंदी केली आहे. केंद्र शासन व राज्य शासनाने लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू केल्याने रस्त्यावरची वर्दळ तसेच बाजारपेठेतील गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने, बाजारपेठा गेल्या महिनाभरापासून पूर्ण बंद आहेत. हॉटेल तसेच नाश्‍त्याची दुकाने बंद असल्याने दिवसरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस जवान, डॉक्‍टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, अशाही परिस्थितीत पोलिस विभागाचे अधिकारी व पोलिस जवान रात्रंदिवस आपले कर्तव्य पार पाडत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत असून पायपीट करणारे मजूर, क्‍वारंटाईन झालेल्या नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था करीत आहेत. संचारबंदीमुळे नागरिक आपापल्या घरीच राहात असले, तरी अनेकजण नाहक घराबाहेर पडत आहेत, अशा नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी झाल्याचे चित्र आहे. पोलिस, आरोग्य विभागाचे कर्मचारी, सफाई कामगार, अंगणवाडीसेविका, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, कोतवाल हे मात्र, जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावून नागरिकांना सहकार्य करीत आहेत.

नदीपात्रातून मजुरांची पायपीट

सिरोंचा तालुक्‍याला तेलंगणा तसेच भूपालपल्ली आणि मंचेरीयल हे दोन जिल्हे लागून असल्यामुळे अहेरी उपविभागातील हजारो मजूर रोजगारासाठी तेथे जात असतात. परंतु यंदा लॉकडाऊनमुळे ते त्या राज्यातच अडकले होते. महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राज्याचे मजूर सिरोंचा मार्गाने जात असल्याने तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला. मात्र, कारवाईच्या धास्तीने मजूर नदीपात्रातून जिल्ह्यात प्रवेश करीत असल्याचेही दिसून येत आहे. ग्रामस्थांच्या धास्तीने दिवसभर जंगलात विश्रांती घेतल्यानंतर मजूर रात्रीच्या वेळी आपल्या प्रवासाला निघतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT