file photo 
विदर्भ

बेरोजगारीवर शोधला उपाय; पान सेंटरला डेलिनिड्‌समध्ये केले परिवर्तीत 

सूरज पाटील

यवतमाळ : कोरोनाने अनेकांना देशोधडीला लावले. दोन वेळेच्या जेवणाची सोय होणार नाही, अशी वेळच नियतीने अनेकांवर आणली. मात्र, अशाही स्थितीत काहींनी उपाय शोधले. पान सेंटरचा व्यवसाय ठप्प झाल्यानंतर त्या जागेचा उपयोग चक्‍क दैनंदिन गरजेतील वस्तूच्या दुकानांमध्ये केली. त्याचा परिणाम असा की, त्यांच्या दोन वेळेचा जेवणाचा प्रश्‍न तुर्तास सुटला. 

हे वाचा—सत्ताधारी पडले तुकाराम मुंढेंवर भारी; दिला 'स्मार्ट' धक्‍का

बेरोजगारी टाळण्यासाठी कित्येकांनी व्यवसायात बदल 
कोरोना नावाच्या विषाणूने अख्खे मानवी जगच बदलून टाकले. उद्योगधंदे बंद झाल्याने नोकरी सोडून अनेकांना आपल्या गावी परत यावे लागले. तर, लॉकडाउन कालावधीत दुकान बंद असल्याने बेरोजगारी टाळण्यासाठी कित्येकांनी व्यवसायात बदल केले. खर्राविक्रीला बंदी असल्याने पान सेंटर डेलिनिड्‌समध्ये परिवर्तीत झाले आहे. आधीच शहरी भागात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढतीवर आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करूनही नोकरी न लागल्याने तरुणांनी व्यवसायात उडी घेतली. ग्रामीण व शहरी भागातील तरुणांच्या हाताला काम नसल्याने निराश झाले आहे. तर, कोरोना संकट रोखण्यासाठी लॉकडाउन पुकारण्यात आल्याने लहान-सहान व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली. प्रशासनाने काही प्रमाणात दुकाने उघडण्यास मुभा दिल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला. मात्र, ज्यांना आपले व्यवसाय सुरू करता आले नाही. त्यांनी चक्क व्यवसायात बदल केले. पान सेंटर चालकांनी तंबाखूजन्य पदार्थ गुंडाळून ठेवत डेलिनिड्‌स साहित्य विक्रीला सुरुवात केली. भाजीपाला व फळविक्रीच्या व्यवसायाचा काहींना आधार मिळाला. घरी बसून राहिल्याने खासगी नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांचे अर्थचक्र बिघडून गेले. खासगी कामानिमित्त घेतलेले कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी हाताला मिळेल ते काम करण्याची वेळ आली आहे. 

घराघरांत चिंतेचे सावट 
मागील तीन महिन्याच्या कालावधीत प्रत्येक व्यक्तीचे अर्थचक्रच बिघडून गेले आहे. मिळकत कमी झाली असली तरी खर्चात कमी नाही. मुलांचे शिक्षण, शाळेची फि, वृद्घ आई-वडिलांचे आजारपण, कर्जाचे हप्ते आदी प्रकारचा खर्च कसा करायचा, ही चिंता घराघरांत दिसत आहे. 

माझा चिवडा विक्रीचा व्यवसाय आहे. लॉकडाउनच्या काळात खाद्यपदार्थ विक्रीस मनाई करण्यात आल्याने हातगाडी बंद ठेवावी लागली. उन्हाळ्याच्या सिझनमध्ये आंबे, पपई, चिकू, केळी अशी फळविक्री करावी लागली. भाजीपाला व फळविक्रीकडे अनेक लोक वळल्याने स्पर्धा वाढली आहे. 
-बाबाराव लोखंडकर,विक्रेता, यवतमाळ. 

-संपादन : चंद्रशेखर महाजन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PlayOff Scenario: सहा संघांनी खेळले ८ सामने, ४ संघांनी ७! प्ले ऑफच्या जवळ कोण अन् दूर कोण? पाहा Point Table ची स्थिती

IPL 2026 Point Table: सुनील नरीनने ३ चेंडूंत Super Over ची मॅच संपवली; कोलकाता नाइट रायडर्सचा रोमहर्षक विजय, LSG चे पॅकअप?

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

SCROLL FOR NEXT