Amboli 
विदर्भ

टाळेबंदीत झाल्या घराच्या भिंती बोलक्‍या; आंबोलीत "आमचं गाव आमची शाळा'... 

युवराज मुरस्कर

शंकरपूर (जि. चंद्रपूर)  : कोरोनाच्या टाळेबंदीमुळे शाळा बंद आहे. ग्रामीण भागातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे बघून आंबोली येथील उच्चशिक्षित तरुणांनी "आमचं गाव आमची शाळा' हा उपक्रम हाती घेतला आहे. गावातील घरांच्या भिंतीवर शैक्षणिक चार्ट रंगवून लहान मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली जात आहे. सायंकाळी अंगणात, सार्वजनिक ठिकाणी, घरांच्या छतावर वर्ग सुरू करून मुलांना शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू आहे. 

कोरोनाने संपूर्ण जगाला वेठीस धरले. भारतातही कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत चालले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा अद्याप शैक्षणिक सत्र सुरू झाले नाही. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शहर, तालुकास्थळी ऑनलाइन शिक्षण देणे सुरू आहे. मात्र, गावखेड्यात अनेकांकडे मोबाईल नाही. त्यामुळे तेथे ऑनलाइन शिकवणे दूरच आहे. मागील पाच महिन्यांपासून मुले शिक्षणापासून दूर आहे. त्यामुळे अभ्यासाचे विस्मरण झाले. शाळा बंद असल्याने मुले दिवसभर एकटीच घरी असतात. ग्रामीण भागात सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. शेतकरी व मजूर दिवसभर शेतात असल्याने मुले एकटीच घरी राहतात. त्यामुळे त्यांची चिंताही आहे. ही बाब लक्षात येताच आंबोलीतील उच्चशिक्षित तरुणांनी लहान मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी हाती घेतली. 

वैभव ठाकरे, आशीष आर. चौधरी या उच्चशिक्षित तरुणांनी गावातील इतर शिक्षित तरुणांना हाताशी धरून "आमचं गाव आमची शाळा' हा उपक्रम हाती घेतला. गावातील घरांच्या भिंतीवर शैक्षणिक चार्ट रंगवून गावात शैक्षणिक वातावरण निर्माण केले. मुलांसाठी चालता बोलता शिक्षण त्यांनी सुरू केले. जणू आता गावातीलच घरच्या भिंतीच मुलांना शिक्षण देऊन मुलांसोबत बोलू लागल्या. दररोज सायंकाळी अंगणात, सार्वजनिक ठिकाणी, घराच्या छतावर वर्ग सुरू भरतात. या माध्यमातून मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. 


टाळेबंदीमुळे शाळा बंद आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही त्यांना शिकविणे सुरू केले आहे. गावातील घरांच्या भिंतीवर शैक्षणिक चार्ट रंगविण्यात आले. दिवसभर मुलांना सोबत घेऊन चालता बोलता शिक्षण देणे सुरू आहे. 
वैभव ठाकरे, आंबोली. 


कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे शाळा सुरू होण्यास वेळ लागेल. तोवर याच माध्यमातून आम्ही त्यांना शिकवू. गर्दी होऊ नये म्हणून प्रत्येक वॉर्डात शाळा भरविण्याचा विचार सुरू आहे. 
आशीष आर. चौधरी, उच्चशिक्षित तरुण आंबोली. 

संपादन - राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: कचरा संकलनासोबत कर वसुलीवरही नजर; नव्या कंपनीला महापालिका आयुक्तांच्या सूचना

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यात रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

Ahilyanagar News: अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ९८६ कोटी थकीत; ठेकेदार आर्थिक अडचणीत, २० टक्केच निधी प्राप्त!

Chhatrapati Sambhajinagar: एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेत ६९.३३ टक्के उपस्थिती; स्पर्धा परीक्षा;शहरातील ३६ केंद्रांवर ३ हजार ५६९ उमेदवारांची दांडी.

Chhatrapati Sambhajinagar: दुकानातील अंगठी बोटात घालून पळण्याचा प्रयत्न; जयभवानीनगर परिसरातील घटना, अल्पवयीन मुलाला तातडीने पकडले.

SCROLL FOR NEXT