son in law cheated his father in law Chandrapur district 
विदर्भ

डोळ्यांना कमी दिसत असल्याने सासऱ्याने रक्कम दिली जावयाकडे; मात्र, केला विश्‍वासघात

साईनाथ सोनटक्के

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : डोळ्याला कमी दिसत असल्याने सासऱ्याने लाखो रुपयांची रक्कम बॅंकेत टाकण्यासाठी जावयाकडे दिली. मात्र, जावयाने सासऱ्याचा विश्‍वासघात केला. पाच लाख 80 हजार रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याची उघडकीस आली. याप्रकरणी सासऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली. जावयाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्‍यातील नांदगाव (जानी) येथे गोपीनाथ रामटेके (वय ६६) हे आपल्या पत्नीसह राहतात. त्यांनी आपल्या मालकीची पाऊण एकर जमीन आठ लाख ५० हजार रुपयांत संतोष ढोरे यांना विकली. संतोष ढोरे यांनी दोन लाख ६० हजार रुपयांचा धनादेश, तर पाच लाख ९० हजार रुपये नगदी दिले. त्यातील दहा हजार रुपये रामटेके यांनी घरखर्चासाठी राखून ठेवले.

डोळ्यांना कमी दिसत असल्याने ते उर्वरित रक्कम, धनादेश घेऊन आपल्या जावयासोबत ब्रह्मपुरी येथील युनियन बॅंकेत गेले. रक्कम व धनादेश भरण्यासाठी जावयाच्या हातात दिली. जावयाने रक्कम व धनादेश भरले असल्याचे सांगितले.

मात्र, काही दिवसांनी रामटेके बॅंकेत गेले. तेव्हा आपल्या रक्कमेचा अपहार झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. जावयाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT