Leopard
Leopard sakal
विदर्भ

सोनेगाव डिफेन्स परिसरात पुन्हा बिबट्या!

सकाळ वृत्तसेवा

सोनेगाव (डिफेन्स) : आयुध निर्माणी अंबाझरी परिसरामध्ये पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने रहिवासी व प्रशासनात चिंतेचे वातावरण पसरले. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे सूचना परिपत्रक जारी केले आहे.

आयुध प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार हा बिबट गुरुवारी कारखान्याच्या प्रवेशद्वार क्रमांक २ समोरील रस्त्यावरून जाताना दिसला. सूचना मिळताच संरक्षण कार्यालय व डीएससीच्या संरक्षण यंत्रणेने बिबट्याचा शोध सुरू केला. मात्र तो अद्याप आढळून आला नाही. परिस्थिती पाहता आयुध प्रशासनाने याबाबत हिंगणा वनविभागाला माहिती दिली आहे. आयुध निर्माणी प्रशासनाने डिफेन्स परिसरातील रहिवासी व कर्मचाऱ्यांना सतर्क करीत आवाहन केले आहे.

त्यांनी एकट्याने बाहेर फिरू नका,हा प्राणी दिसल्यावर हालचाल करू नका, आक्रमकपणे वागू नका, किंवा हा प्राणी हल्ला करेल, अशी कोणतीही परिस्थिती निर्माण करू नका, अशा सूचना दिल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वीही या परिसरात ३ दिवस बिबट्यांचा वावर असल्याची माहिती आहे. त्यावेळी अंबाझरी वनविभागाने कॅमेरे बसवून बिबट्याचा शोध लावला पण त्याला पकडू शकले नव्हते. शेवटी कमलानगर वाडीच्या बाजूने त्याने अंबाझरी वन उद्यानात प्रवेश केल्याची माहिती मिळताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

या संदर्भात हिंगणा-अंबाझरी वनपरिक्षेत्र अधिकारी निनावे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती योग्य असल्याचे सांगितले. बिबट्याची उपस्थिती लक्षात घेता क्षेत्र सहाय्यक हिंगणाचे यु.बी.भामकर यांच्या नेतृत्वाखाली वनकर्मचाऱ्यांचे पथक शोधकार्यात गुंतले आहे. तसेच ५ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परिसरात रात्रीच्या वेळेसाठी पेट्रोलिंगसाठी विशेष पथकही तयार करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Lok Sabha Election Results Live : केरळमध्ये भाजपची सक्सेस स्टोरी? 'या' जागेवर मिळवली अनपेक्षित आघाडी

Baramati Lok Sabha : बारामतीत लेकीचं पारडं जड, सुनेत्रा पवार पिछाडीवर तर सुप्रिया सुळे आघाडीवर, ३४३ चा फरक

Maharashtra Lok Sabha Election Results Live : साताऱ्यात शशिकांत शिंदे 20 हजार मतांनी आघाडीवर, महायुतीचे उदयनराजे पिछाडीवर, तर विशाल पाटलांना 23 हजार मतांची आघाडी

Nagpur Crime : चिमुकलीची हत्या करणाऱ्याला तिहेरी फाशी; तिहेरी फाशीचे पहिलेच प्रकरण

Gold Price Today: आज सोने पुन्हा झाले स्वस्त; लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर सोन्यात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT