Drum cider 
विदर्भ

"ड्रम सिडर'च्या सहाय्याने केली धानाची पेरणी; एका शेतकऱ्याचा नवा प्रयोग 

सकाळ वृत्तसेवा

आमगाव (जि. गोंदिया) : शेती तोट्यात जाणारी असल्याचा समज आजवर होता आणि आहे. परंतु, आताची तरुण पिढी शेतीमध्ये नवनवे प्रयोग आणि तंत्रज्ञानाचा वापर करून ती अधिक फायदेशीर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातच त्यांनी आता भात पिकाच्या लागवडीसाठी "ड्रम सिडर' तंत्रज्ञान अवलंबिले आहे. या "ड्रम सिडर' यंत्राने भातपिकाची लागवड सोपी होणार आहे. कमी वेळात अधिक लागवड होऊन खर्चातही बचत होते. पहिला प्रयोग आमगाव तालुक्‍यात करण्यात आला. एका दिवसात 2 ते 3 एकरात पेरणी पूर्ण होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

कृषी विभागाच्या सहकार्याने भोसा येथील रामेश्‍वर मेंढे व चिंतामन करंजेकर यांच्या शेतात "ड्रम सिडर'च्या साहाय्याने भात पेरणीचा पहिला प्रयोग करण्यात आला. एका ड्रमच्या साहाय्याने दोन ओळी अशा प्रकारे चार ड्रमच्या सहाय्याने आठ ओळीत 20 सेंटीमीटर अंतर ठेवून पेरणी करता येते. या यंत्रामुळे कमी वेळात जास्त पेरणी होते. बियाण्यांची बचत होते. एका मजुराला या यंत्राद्वारे एका दिवसात 2 ते 3 एकरात धान पेरणी करता येईल. धान लावणीच्या वेळी मजुरी खर्चात बचत होते. 

दरम्यान, शेतात प्रात्यक्षिक करतेवेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेश हर्षे, सरपंच सुनील ब्राह्मणकर, उपसरपंच लोकचंद तरोणे, कृषीमित्र टीकाराम भांडारकर, तालुका कृषी अधीक्षक सूरज जाधव, मंडळ कृषी अधिकारी प्रवीण मुंडे, कृषी सहायक ए. एम. एनगंटवार, नितीन मुंडे व गावातील शेतकरी उपस्थित होते 

शेतकऱ्यांनी "ड्रम सिडर'च्या सहाय्याने कमी वेळात धान पिकाची पेरणी करणे शक्‍य होईल. हा प्रयोग उत्तम आहे. शेतकऱ्यांकरिता फायदेशीर आहे. 
- घनश्‍याम चौधरी, कृषी पर्यवेक्षक. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! घरगणनेच्या काळातच शिक्षकांची ‘टीईटी’; २१ जूनला होणार शिक्षक पात्रता परीक्षा; २७ मार्च ते १६ एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज

Merchant Abducted : दीड कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण; अपहृत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका, पाच आरोपींना अटक

Solapur News : सावळेश्वर टोलनाका पुन्हा वादात! चालकाला रक्तबंबाळ करेपर्यंत मारले; पोलिसांनी आवळल्या मुसक्या.

Pune University : पुणे विद्यापीठाला अखेर मिळाले कुलसचिव; छुप्या पद्धतीने नियुक्ती केल्याचा संघटनांचा आरोप

Pune News : विना अडथळा खोदकाम करता येणार; पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश

SCROLL FOR NEXT