soyabesn
soyabesn 
विदर्भ

सोयाबीनचे भाव चार हजारांवर, भावात तेजी मात्र आवक मंदावली

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : हमीदरापेक्षा अधिक भाव मिळत असला तरी आता शेतकऱ्यांकडील खरिपातील सोयाबीन मात्र संपत आले आहे. बाजार समितीमधील सोयाबीनची दिवसेंदिवस घसरत असलेली आवक ही स्थिती स्पष्ट करणारी आहे. गुरुवारी येथील बाजार समितीत 2 हजार 832 पोत्यांची आवक झाली.

यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनला खुल्या बाजारात चांगला भाव मिळाला. शासनाने खरेदी केंद्र सुरू केले व हमीदराने खरेदी सुरू केल्यानंतरही शेतकऱ्यांनी या केंद्रांकडे पाठ फिरवली. हंगाम आता संपत आला असताना शासकीय केंद्रावर आतापर्यंत 100 क्विंटल सोयाबीनही आलेले नाही.

यंदा पावसाची अनियमितता व अवकाळी पावसाचा दणका बसल्याने खरिपातील पिकांसह सोयाबीन या नगदी समजल्या जाणाऱ्या पिकालाही फटका बसला. उत्पादनाची सरासरी कमालीची घसरली. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ सहन करणाऱ्या शेतकऱ्यांवर यंदाही आघात झाला. मूग व उडीद बुडाल्यानंतर सोयाबीनपासून शेतकऱ्यांना अपेक्षा होत्या. खुल्या बाजारात यंदा सोयाबीनमधील तेजी शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली. हंगामाच्या सुरुवातीपासूनच खरेदीदारांनी भाव चढे ठेवलेत.

हमीदरापेक्षा चढे दर मिळाल्याने सोयाबीनचा शेतकरी थोडाफार सुखावला आहे. चार हजारांचा आकडा यंदा सोयाबीनने पार केला. गुरुवारी येथील बाजार समितीत चार हजार किमान तर 4152 कमाल भाव मिळाला. भाव चढत असताना सोयाबीनची आवक मात्र घसरली आहे. केवळ 2 हजार 832 पोत्यांची आवक झाली.

या सप्ताहात आवक चांगलीच घसरल्याचे बाजार समितीचे सचिव विजयकर यांनी सांगितले. गेल्या महिनाभर पाच ते सात हजारांवर आवक गेली होती. त्यापूर्वी वीस हजारांपर्यंत आवक नोंदविल्या गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT