soybean e sakal
विदर्भ

दोन दिवसांपासून सोयाबीनचे भाव होत आहेत कमी, आता क्विंटलमागे इतका दर

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : सोयाबीनला चढ्यादरांची सोनेरी झळाळी चढली असतानाच गेल्या दोन दिवसांत मात्र भाव कोसळू (spybean rate) लागले आहेत. सोमवारच्या (ता.दोन) तुलनेत आता साडेपाचशे रुपयांनी भाव कमी झाले आहेत. पुढील हंगामात सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव राहण्याची शक्यता खरेदीदारांनी वायदे बाजाराच्या हवाल्याने वर्तविली आहे.

गेल्या महिनाभरापासून सोयाबीनला प्रती क्विंटलमागे नऊ हजारांवर भाव मिळू लागला आहे. सोमवारी येथील बाजार समितीत उच्चांकी 10 हजार 251 पर्यंत भाव चढले होते. त्यानंतरच्या दोनच दिवसांत साडेपाचशे रुपयांचा फरक पडून भाव खाली आलेत.

गेल्या एक आठवड्यात कमाल व किमान भावातील चढउतार सोयाबीनमधील सोनेरी झळाळी वाटत असली तरी आवक मात्र एक हजार पोत्यांपेक्षाही कमी असल्याने चढ्या दरांचा नेमका लाभ कुणाला? हा प्रश्न आहे. या हंगामातील पेरणी आटोपली असून सोयाबीन फवारणीवर आले आहे. शेतकऱ्यांकडे गेल्या हंगामातील सोयाबीन शिल्लक नाही. काही शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांकडील सोयाबीन या बाजारात येऊ लागला आहे, असे खरेदीदारांनी सांगितले. त्यामुळे बाजारात भाव भलेही चढे दिसत असले तरी लाभ मात्र शेतकऱ्यांच्या पदरी पडू शकलेला नाही. सोयाबीनच शिल्लक नसताना चढलेल्या दरांचा लाभ व्यापाऱ्यांच्याही पदरी पडलेला नाही, असे अडते राजेश पाटील यांनी सांगितले.

का वाढलेत भाव? -

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती भडकल्या आहेत. डिओसीची मागणी वाढली आहे. गेल्या हंगामात चायनासह प्रमुख उत्पादक देशांतील सोयाबीनचे उत्पादन घसरले आहे. चायनाकडून विशेष मागणी असून त्यामुळे भाव वाढल्याचे कारण खरेदीदार दीपक जाजू यांनी सांगितले.

उत्पादनाची सरासरी कमी राहण्याची शक्यता -

2021-22 साठी सोयाबीनला 3950 रुपये हमी भाव जाहीर करण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत केंद्र सरकारने केवळ सत्तर रुपयांची वाढ केली आहे. यंदा प्रमुख उत्पादक असलेल्या मध्य प्रदेशातील शिवपुरी व अशोकनगर या भागात पावसामुळे हे पीक धोक्यात आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यात सोयाबीनची स्थिती फार चांगली नसून उत्पादनाची सरासरी कमी राहण्याची शक्यता आहे. वायदे बाजारात झालेल्या सौद्यानुसार यावर्षी सोयाबीनला साडेपाच हजार रुपये क्विंटल भाव राहण्याची शक्यता खरेदीदारांनी वर्तविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Kolhapur Dairy Scheme : गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना भरभरून देतय, शेतमजूर, अल्पभूधारकांना आणली आता नवी योजना, काय आहे फायद्याची स्कीम

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

Latest Marathi News Live Update: राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने काम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT