rajura sports ground news, rajura chandrapur news, chandrapur latest news, चंद्रपूर लेटेस्ट न्यूज, चंद्रपूर मराठी न्यूज, राजुरा क्रीडासंकुल न्यूज 
विदर्भ

राजुऱ्यातील क्रीडासंकुलाला घरघर, तरुण जीव धोक्यात घालून महामार्गावर करतात सराव

प्रमोद काकडे

राजुरा (जि. चंद्रपूर): क्रीडाप्रेमींना तंत्रशुद्ध पद्धतीने खेळाचा सराव करता यावा, या उद्देशाने तालुकास्तरावर क्रीडासंकुले तयार करण्यात आली आहेत. मात्र, येथील क्रीडासंकुलात झुडपे वाढली आहेत. मोकाट जनावरांचा नेहमीच वावर असतो. त्यामुळे युवकांना नाइलाजास्तव जीव धोक्‍यात घालून महामार्गाने सरावासाठी जावे लागत आहे.

शहरातील व तालुक्‍यातील क्रीडाप्रेमींना तंत्रशुद्ध पद्धतीने खेळाचा सराव करता यावा, लहान-मोठ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे सोयीचे व्हावे या उद्देशातून तालुका क्रीडासंकुल निर्माण करण्यात आले आहे. सुमारे 15 एकर परिसरात हे संकुल आहे. इनडोअर खेळ खेळण्यासाठी मोठा हॉलसुद्धा आहे. मैदानी कसरतीसाठी व्यायाम साहित्य आहे. परंतु, या संकुलाची देखरेख व दुरुस्तीकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. संकुलाचा वीजपुरवठा मागील काही दिवसांपासून बंद आहे.

परिसरात सर्वत्र झुडपे वाढली असल्याने मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. स्वच्छतागृहाची पूर्णपणे दूरवस्था झाली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेले क्रीडासंकुल शोभेची वास्तू ठरली आहे. क्रीडासंकुलाच्या दूरवस्थेमुळे शहरातील युवकांना जीव धोक्‍यात घालून महामार्गावर धावणे, इतर कसरतीचा सराव करावा लागत आहे. युवकांना दर्जेदार क्रीडा प्रकार व त्याचे तंत्र शुद्ध सराव करता यावा यासाठी क्रीडासंकुलाच्या देखभालीची जबाबदारी एखाद्या क्रीडा अकादमीकडे सोपविण्यात यावी, अशी मागणी छत्रपती क्रीडा अकादमीच्या पदाधिकारी, युवकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT