विदर्भ

श्रीनिवास रेड्डीची उच्च न्यायालयात धाव; राज्य शासनाला नोटीस

केतन पळसकर : सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचारी दीपाली चव्हाण (Deepali Chavan) यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार म्हणून प्रकल्प संचालक तथा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास रामासुब्बा रेड्डी (Srinivasa Reddy) यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये (high court) धाव घेतली आहे. त्याच्यावर दाखल गुन्हा रद्द करावा या विनंतीसह त्याने याचिका दाखल केली आहे. (Srinivas Reddys run in the High Court)

या प्रकरणावर आज न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांच्या समक्ष सुनावणी झाली. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर रेड्डी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर रेड्डी यांचं निलंबन करण्यात आलं होतं. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात काही अधिकाऱ्यांची नावं लिहिलेली होती. याच प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे रेड्डी यांचं अखेर निलंबन करण्यात आलं होतं. अखेर चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.

नुकतेच, कनिष्ठ न्यायालयाने शनिवारी (ता. १) पुढील चौदा दिवसांपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले. धारणी पोलिसाच्या मार्गदर्शनात रेड्डींना विशेष पथकाच्या देखरेखीत अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात स्वाधीन करण्यात आले असून रेड्डींना अमरावतीच्या स्थानिक अंध विद्यालयात उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या खुल्या कारागृहात ठेवण्यात आले आहे.

उच्च न्यायालयाने राज्य शासनाला नोटीस बजावली असून या प्रकरणावर १४ जून रोजी अंतिम सुनावणी निश्‍चित केली आहे. तर, तपास सुरु ठेवत उच्च न्यायालयाच्या परवानगी शिवाय दोषारोपपत्र दाखल करू नये, असे न्यायालयाने नमूद केले. रेड्डीतर्फे ॲड. ए. ए. नाईक यांनी बाजू मांडली.

(Srinivas Reddys run in the High Court)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT