ST bus comes in their village after 15 years  
विदर्भ

अख्ख्या गावात वाटली मिठाई! तब्बल १५ वर्षांनी झालं असं काही आनंद गगनात मावेनासा

मोहन सुरकार

सिंदी रेल्वे (जि. वर्धा) : विदर्भ राज्य आघाडीचे तालुका प्रमुख रामकिशोर शिंगणधुपे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आणि १५ वर्षाने दहेगावा (गोसावी) येथे मंगळवारी (ता.१९)सकाळी ७:३० वाजता वर्धा डेपोच्या लालपरीचे आगमन झाले असता ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला. 

दहेगाव (गोसावी) यालाच तुळजापूर रेल्वे या नावाने सुध्दा ओळखले जाते या गावात फार पुर्वीपासुन रेल्वे स्टेशन आहे आणि आता काही वर्षा अगोदर सिंदी पोलिस ठाण्यातुन वेगळे करित येथे स्वतंत्र पोलिस ठाणे अस्तित्वात आले आहे. मात्र आतील गाव असल्याने दळणवळणासाठी येथील ग्रामस्थांना फार त्रास आणि आर्थिक दृष्ट्या अडचणीचे होते.

विशेष म्हणजे दररोज सकाळी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि कामासाठी गावाबाहेर शहरात जाणार्‍याना फारच अडचणीचे होत शिवाय मागील वर्षभरापासून रेल्वे बंद असल्याने हा त्रास कमालीचा वाढला होतो.म्हणून विदर्भ राज्य आघाडीचे तालुका प्रमुख रामकिशोर शिंगणधुपे यांनी ही समस्या हेरली आणि सतत पाठपुरावा केला. यासाठी असंख्य वेळा त्यांनी एसटी महामंडळाच्या कार्यालयाचे उंबरठा झिझविला. 

त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत मंगळवारी ता. १९ पंधरा वर्षांपासून बंद पडलेली बससेवा लालपरीच्या आगमनाने पुर्वत सुरु झाली. हा दिवस उजडण्यासाठी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे यांचे खुप आभार मानले. लालपरी आगमनाप्रसंगी बस गाडीचे पुजन करुन चालक आणि वाहकाचा नारळ आणि दुप्पटा देऊन सन्मान करण्यात आला. सोबतच मिठाई वाटुन सर्वानी आनंद साजरा केला. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT