file photo 
विदर्भ

एसटी कर्मचारी तीन महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत, जगण्याचा प्रश्‍न कायम

चेतन देशमुख

यवतमाळ : कोरोनामुळे अनेकांपुढे मोठे प्रश्‍न उभे केलेले आहेत. छोटे व्यावसायिक व कंत्राटी कामगारांवर संकट कोसळले आहे. अशातच आता निमशासकीय सेवेत येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांपुढे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. कधी ५० टक्के, कधी ७५ टक्के वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले.

आता तर गेल्या दोन महिन्यांपासून वेतनही मिळाले नाही. सप्टेंबर महिन्याचे केवळ तीन दिवस शिल्लक आहेत. तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांसमोर जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

कोरोनामुळे गेल्या जवळपास सात महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या जिवाची घालमेल सुरू आहे. सुरुवातीला वाहतूक बंद झाल्याने कर्मचाऱ्यांना टप्पाटप्प्यात वेतन देण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. थकीत असलेले वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले. मात्र, त्याआधी अनेक अडचणींचा सामना अनेक कर्मचाऱ्यांना करावा लागला.

तीन दिवसांनंतर तीन हिने पूर्ण

लॉकडाउन काळात टप्प्याटप्प्यात मिळणाऱ्या वेतनामुळे कर्मचारी चिंतित आहेत. अशातच आता जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे वेतन अद्याप झालेले नाही. तीन दिवसांनंतर सप्टेंबर महिनाही पूर्ण होणार आहे. परिणामी तीन महिन्यांच्या वेतनाच्या प्रतीक्षेत कर्मचारी आहेत. गेल्या ९० दिवसांपासून वेतन नसल्याने अनेकांवर उधारीवर जगण्याची वेळ आली आहे. कर्मचारी व कामगार संघटनांकडून वेतनाबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्याप निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांचा जीव पुन्हा टांगणीला लागला आहे.


एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

कोरोनामुळे प्रवासी संख्या घटली आहे. त्यामुळेच एसटी महामंडळासमोरही अनेक प्रश्‍न निर्माण झालेले आहेत. या काळात शासनाने एसटीला मदत करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची आहे. तीन दिवसांनी तीन महिने पूर्ण होणार आहेत. यादरम्यान वेतन न झाल्यास बिकट परिस्थितीचा सामना करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर येणार असल्याचे मत कर्मचारी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

संघटनेकडून पाठपुरावा सुरू
गेल्या दोन महिन्यांपासून वेतन झालेले नाही. तीन दिवसांनी तीन महिने होतील. कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे, यासाठी आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. संघटनेकडून पाठपुरावादेखील सुरू केलेला आहे.
-संदीप शिंदे, अध्यक्ष, एसटी कामगार संघटना, मुंबई.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: भरधाव मोटारीच्या धडकेत कोथरूडच्या तरुणाचा अंत; संगमनेर-नऱ्हे रस्त्यावर भीषण अपघात!

समुद्रात बुडून पती राहुलचा मृत्यू झाल्यानंतर आता पत्नीने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणते- आम्हाला सगळ्यांनाच मोठा...

Karjat Accident: कर्जत रस्त्यावर अपघात, सात विद्यार्थी जखमी; अकलुज येथील वॉटरपार्कला जात हाेते अन् अचानक काय घडलं!

Latest Marathi News Live Update : लातूरमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा कायम, गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांग

Laptop Safety Tips : काय तुम्हीपण गादीवर लॅपटॉप ठेऊन चार्ज करताय-काम करताय? आजपासून बंद करा 'या' ३ चुका, नाहीतर होईल मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT