state government did not include Chikhaldara in tourism program  
विदर्भ

धक्कादायक! चिखलदरा पर्यटन महोत्सवाला डच्चू; शासनाच्या यादीत विदर्भाच्या नंदनवनाचे नावच नाही

नारायण येवले

चिखलदरा (जि. अमरावती) ः राज्यशासन महाराष्ट्रातील २० ठिकाणी पर्यटन महोत्सवाचे आयोजन फेब्रुवारी ते मार्च दरम्यान करणार आहे. या पर्यटन महोत्सवामधून विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्याला वगळण्यात आल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे. 

दरवर्षी चिखलदरा पर्यटन महोत्सव मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येतो. परंतु मागील चार वर्षांपासून हा पर्यटन महोत्सव बंद करण्यात आला आहे. त्याच्या कारणांचा शोध कोणीच घेतलेला नाही. राज्य शासन महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पुढाकार घेत आहे. ही सकारात्मक बाब असतानाच यंदा निवडण्यात आलेल्या पर्यटनस्थळांच्या यादीत चिखलदऱ्याचे नाव नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे मेळघाटच्या आदिवासी बांधवांसह पर्यटकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यातील अकोट फॉरेस्ट रेंजमध्ये असल्याने अमरावती जिल्ह्याला पर्यटन महोत्सवासाठी स्थान मिळाले नाही, ही जनभावना बोलून दाखवली जात आहे. छोट्या जागेअभावी रखडलेला स्कायवॉक प्रकल्प, रस्त्यांची झालेली दुर्दशा लपविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने चिखलदरा पर्यटन स्थळाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, असेही अनेक पर्यटक बोलून दाखवीत आहेत. राज्य शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे रखडलेला चिखलदरा पर्यटन विकासाचा आराखडा लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे रेटून धरला जात असला तरी फारसे यश येत नसल्याची भावनाही बळावत आहे. 

पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने चिखलदरा तसेच मेळघाटच्या आदिवासी क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होणार असल्याने सर्व स्तरावरून या महोत्सवासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, सुमारे चार वर्षांपासून बंद असलेला चिखलदरा पर्यटन महोत्सव या निमित्ताने तरी सुरू व्हावा ही अपेक्षा आहे. राज्य शासनाने पर्यटन विकास आराखड्याला गती देऊन विकास महोत्सव म्हणून हा पर्यटन महोत्सव साजरा करावा, अशी अपेक्षा सुनील भालेराव यांनी व्यक्त केली. 

चिखलदरा महोत्सव चार वर्षांपासून बंद आहे. तो आता व्हायला हवा होता. परंतु शासनाने विदर्भातील नंदनवनाकडे दुर्लक्ष केले आहे. अगोदरच भरपूर अडचणी आहेत. त्यामुळे शासनाने चिखलदरा पर्यटन महोत्सव सुरू करावा.  
- विजया सोमवंशी, 
नगराध्यक्ष, चिखलदरा.

चिखलदऱ्याचे नाव महाराष्ट्र शासनाने पर्यटन महोत्सवातून वगळणे म्हणजे जिल्ह्यातील नेत्यांसाठी लाजिरवाणी बाब आहे. आम्ही या निर्णयाचा निषेध करतो. 
- मनोज शर्मा, 
सचिव, हॉटेल ओनर्स असोसिएशन.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

B.Ed student set herself on fire: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

Pune News: माेठी बातमी! 'संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा'; पुरंदर-हवेली मतदारसंघात खळबळ

Solapur: राष्ट्रवादीच्या दोन जिल्हाध्यक्षपदाचा तिढा सोमवारी सुटणार?; बळिराम साठे ज्येष्ठ नेते शरद पवारांना भेटणार

Latest Marathi News Updates : पुणेकरांसाठी आता खासदार कार्यालय दिवसरात्र खुलं राहणार - मुरलीधर मोहोळ

SCROLL FOR NEXT