Dhaan Kharedi 
विदर्भ

शेतकऱ्यांना दिलासा ः वनहक्क शेतजमीनधारकांचे धान राज्यशासन खरेदी करणार

संजीव बडोले

नवेगावबांध (जि. गोंदिया) ः वनहक्क जमिनीचा सातबारा उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांचे धान आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी केले जात नव्हते. यासाठी अर्जुनी मोरगाव तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. देवाजी कापगते, ऋषी पुस्तोडे यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. त्यांच्या प्रयत्नाने वनहक्क जमिनीचा सातबारा उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जावे, अशा प्रकारचा शासन निर्णय राज्य शासनाने १४ डिसेंबरला काढला आहे. त्यामुळे वनहक्क जमिनीतील शेतकऱ्यांचे धान खरेदी केंद्रावर खरेदी केली जाणार आहेत.

याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी गोंदिया काढून जिल्हा पणन अधिकारी गोंदिया, प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ भंडारा, जिल्हा प्रतिनिधी एनईएमएल गोंदिया यांना निर्देश दिले आहेत. या आदेशामुळे वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांचा धान विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

२९ सप्टेंबर २०२० रोजीच्या संदर्भातील शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक ७(४) मध्ये नमूद केलेल्या वनहक्क अधिनियम २००५ अन्वये वनांमधील जमिनी शेतकऱ्यांना दिलेल्या असल्यास त्याबाबतचे ८-अ प्रमाणपत्र मिळत नसल्याने अशा शेतकऱ्यांकडून नमुना ८- अ ऐवजी शेतकऱ्यांचे वनहक्क अधिनियम २००५ नुसार वनांमधील त्यांच्या जमिनीचे धारण क्षेत्र निश्‍चित करण्यात आलेल्या शासकीय कागदपत्रांच्या आधारे धान खरेदी करण्यात यावी, अशी तरतूद करण्यात आली आहे. 

तसेच कोणत्याही परिस्थितीत शेतकरी नसलेल्यांकडून धान खरेदी होणार नाही. तसेच जमिनीच्या क्षेत्रफळाशी सुसंगत धान खरेदी होईल, ही दक्षता घेण्याबाबत शासनाचे संदर्भीय पत्र निर्देश देण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने एनईएमएल यांनी अशा शेतकऱ्यांचे धान खरेदी ऑनलाइन होण्याबाबत ऑनलाइन पोर्टलवर तशी तरतूद करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांकडून प्राप्त झालेल्या वनहक्क पट्टेधारकांच्या साफ्ट कॉपीमधील याद्या शासनाचे संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने कार्यवाहीकरिता संबंधितांना पाठविण्यात आले आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे वनहक्क जमिनीचा सातबारा उपलब्ध नसलेल्या जमीनधारक शेतकऱ्यांच्या धान खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत अर्जुनी मोरगाव तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. देवाजी कापगते व ऋषी पुस्तोडे यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व शासनाचे आभार मानले आहेत.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT