Stoves will disappear from schools in the state 
विदर्भ

शाळांमधून चुलीचा धूर होणार गायब; ४१ हजार शाळांना मिळणार एलपीजी गॅस

प्रभाकर कोळसे

नंदोरी (जि. वर्धा) : शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत अन्न शिजविण्यासाठी राज्यातील ४१ हजार ७४४ शाळांना अनुदान उपलब्ध करून एलपीजी गॅस जोडणी देण्यात येणार आहे. यामुळे शाळांमधून चुलीचा धूर गायब होणार आहे. यामुळे सहजासहजी व विनात्रास अन्न शिजविण्याची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

अन्न शिजविण्यासाठी अतिरिक्त एलपीजीवरील अनुदान केंद्र सरकारने २०१५ मध्ये मंजूर केले होते. केंद्राच्या वाट्याचे ६३ कोटी १७ लाख व राज्याच्या वाट्याचा २१ कोटी पाच लाख रुपये असा एकूण ८४ कोटी २२ लाख रुपयांचा निधी वितरित केला होता.

यात केंद्र शासनाच्या शिल्लक निधीतून नवीन गॅस जोडणी द्यावी व राज्याच्या वाट्याची शिल्लक रक्कम चलनाद्वारे कोषागारात जमा करावी, असे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले होते.

मात्र, या आदेशाप्रमाणे बहुसंख्य शाळांनी कार्यवाही केली नाही. वारंवार मागणी करूनही त्याची माहिती सादर केली नाही. शाळांमधील गॅस जोडणीची खात्री क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे.

...अन्यथा शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई

शाळांमधील गॅस जोडणीबाबतचा सद्य:स्थिती अहवाल सादर करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. अहवाल सादर करण्यात दिरंगाई केल्यास संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिले आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Government Employees Salary : केंद्रीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारकांना दिलासा; २५ सप्टेंबरलाच वेतन-पेन्शन जमा होणार

Bank Update: रविवारीही बँका राहणार सुरू! सरकार आणि RBIचा मोठा निर्णय

Mumbai News: गणेश विसर्जनाला मोठी गर्दी होणार! मुंबईतील महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद, मेट्रो सेवेतही बदल; वाचा सविस्तर

गणपती विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; दीपक वागसकर यांचा मृत्यू, कार्यकर्त्यांचा पोलिसांवर आरोप | Ahilyanagar, Bhingar

Vivo Smartphone: 10,000mAh बॅटरी आणि 1.5K AMOLED डिस्प्लेसह येतोय Vivo S2 FE 5G; पाहा दमदार फीचर्स अन् किंमत...

SCROLL FOR NEXT