विदर्भ

विचित्रच! बाहुबली, कटप्पा व शिवगामीदेवी बाजारात; काय आहे हा प्रकार

रेवननाथ गाढवे

निलज बु. (जि. भंडारा) : मृग नक्षत्राच्या पावसाची चाहूल लागताच जिल्हाभरातील शेतकरी खरिपाच्या (kharif crops) पेरणीच्या लगबगीत लागतो. पेरणीची पूर्वतयारी म्हणून शेतकरी शेतीची मशागत करण्यासाठी वखरणी, नांगरणी करून ठेवतात. नंतर प्रश्न पडतो धानाची बियाणे मिळविण्याचा. यासाठी तो गावातील सोबतच्या शेतकऱ्यांना धानाच्या वेगवेगळा वाणांबद्दल विचारपूस करू लागतो. प्रत्येक जण आपापल्या अनुभवावरून धानाच्या (Paddy) वेगवेगळ्या वाणांची माहिती सांगत असतो. मग शेतकरी बाजारातील बियाणांच्या दुकानाकडे धाव घेतो व योग्य बियाणे (Seeds) निवडून धानाची लागवड करतो. (Strange-name-given-to-grain-varieties-by-the-company)

यावर्षी मात्र बाजारातील धानाच्या बियाणांची अफलातून व विचित्र नावे शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. अलीकडेच दक्षिण भारतात प्रदर्शित होऊन देशभरात सुप्रसिद्ध झालेल्या बाहुबली या सिनेमावरून धानाच्या बारीक स्वरूपाच्या बियानाला एका खासगी कंपनीने ‘बाहुबली’ हे नाव दिले आहे. सोबतच बाहुबली सिनेमातून प्रसिद्ध झालेला बाहुबलीचा मामा ‘कटप्पा’ याचेही नाव एका ठोकळ धानाच्या बियाणाच्या वाणाला देण्यात आले आहे. हद्द तर तेव्हा होते की, एका कंपनीने तर बाहुबलीची आई ‘शिवगामीदेवी’ इचेही नाव बियाणांना दिले आहे.

बाजारात आलेल्या धानाच्या बियानांपैकी बाहुबली, कटप्पा, शिवगामीदेवी सोबतच श्वेता, पौर्णिमा, मनीषा, पुष्पा, सुमन, मनाली, प्रणाली, यशोदा, परंपरा, अहिल्या, महालक्ष्मी, गीतांजली, लक्ष्मी अशी स्त्रियांची नावेही देण्यात आली आहेत. धान्याची नावे जरी आकर्षक असली तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाणांचा किमतीमध्ये ३० रुपयांपासून ते ६० रुपयांपर्यंत व काही वाणांमध्ये ही वाढ जास्तही झालेली पाहावयास मिळते आहे. इंधनाचे वाढलेले दर व त्यामुळे वाढलेला वाहतूक खर्च यामुळे बियाणांच्या दरात किंचित वाढ झाल्याचे कृषी केंद्र चालक सांगतात. बियाणांची अशी प्रसिद्ध व अफलातून नावे शेतकऱ्यांना मात्र आकर्षित करीत असल्याचे दृश्य बाजारपेठांमध्ये पाहावयास मिळत आहेत.

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा थोडं का असेना पण इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला व त्यामुळे बियाणांच्या किमतीत वाढ झाली आहे. आम्ही मात्र शेतकऱ्यांना कमी किमतीत गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध करून देत आहोत.
- युवराज बुधे, मालक, रेणुका कृषी केंद्र, माडगी

(Strange-name-given-to-grain-varieties-by-the-company)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: राजस्थान रॉयल्सने स्वतःसाठी खड्डा खणला... गुजरात टायटन्समुळे Point Table फिरला; PBKS, RCB ला धक्का

Donald Trump: व्हाईट हाउसमध्ये वैदिक मंत्रोच्चारण; बीएपीएस स्वयंसेवकांनी वैश्विक शांततेसाठी केली प्रार्थना

RR vs GT Live : छोटी हाईट, वातावरण टाईट! वैभव सूर्यवंशीने मोडला विराट, सूर्या, श्रेयस अन् ख्रिस गेलचा विक्रम; बनतोय नवा 'हिटमॅन'

SSC Exam Result : निरक्षर आई-वडिलांच्या मुलाने दहावीत मिळविले ९४ टक्के गुण

RR vs GT Live : आशिष नेहराने खुणावलं... मोहम्मद सिराजने अगदी तसं केलं... वर्ल्ड रेकॉर्ड करणारा वैभव सूर्यवंशी असा फसला Video

SCROLL FOR NEXT