Lockdown esakal
विदर्भ

रविवारपासून कडक लॉकडाउन, वैद्यकीय सेवा वगळून किराणा भाजीपाल्यासह सर्वच बंद

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कोरोना (coronavirus) रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत असून सध्याच्या संचारबंदीमुळे (lockdown) सुद्धा यात काहीच फरक पडत नसल्याने आता जिल्हा प्रशासनाने रविवारपासून (ता.9) सात दिवसांचा म्हणजेच 15 मे पर्यंत कडक लॉकडाउन (strict lockdown) लावण्याचा निर्णय घेतला आहे. या लॉकडाउनमध्ये किराणा, डेअरी, भाजीपाला, बाजार समित्यासुद्धा बंद राहणार आहे, तथापि सदर दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7 ते 11 यावेळेत देता येणार आहे. (strict lockdown in amravati from sunday)

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्णसंख्या वाढीस लागली असून प्रशासन हतबल झाले आहे. जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीच्या नावाखाली शहर तसेच ग्रामीण भागात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्याअनुषंगाने आता जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर निर्णय घेतला आहे. किराणा साहित्य, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई, पिठाची गिरणी सह कोंबडी, मटणाची दुकाने व मद्यदुकाने तसेच बार पूर्णपणे बंद राहतील. याशिवाय केशकर्तनालये, स्पा, ब्युटीपार्लर बंद राहणार आहेत. लग्नसमारंभांलाही कडक निर्बंध लादण्यात आले असून उपस्थितीची मर्यादा व दोन तासांचा अवधी अशा अटी राहणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास दुकानात जाऊन स्वतः खरेदी करता येणार नाही. याबाबतचे नियोजन महापालिका तसेच नगरपालिकेला त्यांच्या स्तरावरून करण्यात येणार आहे.

आता तरी गंभीर होण्याची गरज -

कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक घातक असून असाच कायम राहिल्यास वैद्यकीय सुविधांवर मर्यादा पडणार आहे. अशीच रुग्णवाढ होत राहिल्यास पुढे कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिला.

पार्सलसेवा सुरू राहणार -

हॉटेल, रेस्टॉरेन्ट, खानावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच पार्सल सेवा सकाळी 11 ते सांयकाळी 7 पर्यंत सुरू राहील. सदर ठिकाणी ग्राहक आढळून आल्यास आस्थापनेच्या मालकावर कारवाई केली जाणार आहेत.

शेतकऱ्यांच्या बांधावर नेणार साहित्य -

लॉकडाउन दरम्यान कृषी अवजारे तसेच शेती उत्पादनाशी संबंधित दुकाने पूर्णपणे बंद राहतील, शेतकऱ्यांशी संबंधित वस्तूंचा पुरवठा बांधापर्यंत नेण्याची जबाबदारी कृषी सेवक, तालुका कृषी अधिकाऱ्यांची राहणार आहे.

वैद्यकीय सेवा 24 तास -

लॉकडाउन कडकडीत राहणार असला तरी अत्यावश्‍यक सेवेतील रुग्णालये, पशुचिकित्सा सेवा तसेच मेडीकल्सला 24 तास परवानगी राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT