perni kharip soyabean (4).JPG
perni kharip soyabean (4).JPG 
विदर्भ

...असे दमदार नियोजन केले तर, मिळेल खरिपात जोमदार उत्पादन

अनुप ताले

अकोला : खरीप आठवडाभरावर येऊन ठेपला असून, शेतकरी पेरणीच्या तयारीला सज्ज होत आहेत. परंतु, जोमदार खरीप हवा असेल तर, शेतकऱ्याला आताच दमदार नियोजन करणे गरजेचे असून, स्वतःच्या आरोग्य सुरक्षेचे उपाययोजन करणेही तेवढेच महत्वाचे ठरणार आहे.


गेल्या पाच वर्षांपासून दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, कीडींचा हल्ला, फोफावलेले तण, शेतमालाचे कमी भाव इत्यादी कारणाने शेतकरी सातत्याने नुकसान सोसत आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी कमी खर्चात अधिक व गुणवत्तापूर्ण शेतमाल उत्पादन घेण्याचा आणि त्यावर प्रक्रिया करून बाजारपेठेत तो विक्री करण्याचा सल्ला कृषी अभ्यासकांनी दिला आहे. परंतु, हे सर्व करण्यासाठी आणि जोमदार हंगाम ठरण्यासाठी पेरणीपासूनच योग्य व दमदार  नियोजन करण्याचे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.

असे करा खरीप पेरणीचे नियोजन

  • पाऊस सुरू होण्यापूर्वीच मृदसंधारणाची कामे पूर्ण करा.
  • पहिला 75 ते 100 मिली पाऊस झाल्यानंतर जांभुळवाही देऊन काडीकचरा वेचून उताराला आडवी पेरणी करावी.
  • उत्पादन खर्च कमी करण्यासाठी, घरचे बियाणे, पिकाचे हंगामपूर्व नियोजनाप्रमाणे स्वच्छ करुन घरीच बियाण्याची उगवण तपासणी तज्ञांच्या सल्ल्यानुसार करावी.
  • पेरताना द्यावयाची खते, बियाणे खाली पडेल व योग्य मात्रेत राहील याची काळजी घ्यावी.
  • पाऊस आधीच सुरू होऊन पिके पेरली गेली असल्यास विरळी अथवा ठोकून हेक्टरी झाडांची योग्य संख्या ठेवा.
  • कडुनिंबाच्या निंबोळ्या या काळात उपलब्ध असतात त्या साठवून ठेवा त्याचा पुढे कीड नियंत्रणासाठी उपयोग होतो.
  • एक पीक पद्धतीने पिकांची लागवड न करता, शिफारशीप्रमाणे पिकाची फेरपालट व जमिनीच्या मगदुरानुसार आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.
  • मूलस्थानी जलसंधारणासाठी कंटूर पद्धतीचा अवलंब करावा तसेच बिबिएफचा वापर करावा.
  • पेरणीचे क्रम, कपाशी, मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, सूर्यफूल व एरंडी याप्रमाणे ठेवावा.
  • पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशके, जैविक बुरशीनाशके व जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
  • तणनाशकाचा वेळीच योग्य प्रमाणात वापर करावा.
  • कृषी विषयक अधिक माहितीसाठी कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ञांकडे संपर्क साधावा.

कृषी निविष्ठांची जुळवाजुळव करतांना घ्या काळजी
कृषी निविष्ठांची जुळवाजुळव करण्यासाठी/ खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रावर जात असताना शक्यतो अगोदरच दुकानदाराशी फोनद्वारे संपर्क साधून मागणी नोंदवा. कृषी केंद्रावर गर्दी असल्यास सोयीची वेळ साधून कृषी निविष्ठा खरेदीसाठी जा. कितीही जवळचा व्यक्ती किंवा नातेवाईक, कोणासोबतही हस्तांदोलन, गळाभेट टाळा. खरेदी करून घरी परतल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवा कपडे धुऊन ठेवा.

कोरोना पासून बचाव करण्यासाठी...
कोरोनापासून बचाव करण्यासाठी शेतकरी, शेत मजुरांनी शेतात काम करत असताना एकमेकांपासून किमान पाच फूट अंतर ठेवावे. नका तोंडाला मास्कचा वापर करावा. शेतमाल कापणी, तोडणी करताना चार ते पाच फुटांचा पट्टा वाटून घ्यावा. गर्दी टाळावी, वेळोवेळी साबणाने हात धुवावे, सॅनिटाईझरचा वापर करावा. कुठलाही आजार झाल्यास त्वरित शासकीय डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन कृषी विद्यापीठ, कृषी विभागाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT