India post payment bank 
विदर्भ

विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज… इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंकेच्या खात्यात मिळणार शिष्यवृत्ती 

चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्ह्यात शिष्यवृत्तीपासून दहा हजार विद्यार्थी वंचित आहेत. विद्यार्थ्यांचे आधार सीडेड बॅंक खाते नसल्याने त्यांची शिष्यवृत्ती जमा झाली नाही. मात्र, ही शिष्यवृत्ती आता इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक खात्यातून मिळणार आहे. त्याचा दिलासा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात दहा हजार विद्यार्थ्यांची पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप (दहावीनंतर) आधार सीडेड बॅंक खाते नसल्याने त्यांच्या सध्याच्या बॅंक खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने यावर मार्ग काढत, अशा विद्यार्थ्यांची आवश्‍यक अशी सर्व माहिती "इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंकेला" सादर केली आहे.

वंचित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या गावातील पोस्ट ऑफिसमध्ये, पोस्टमनकडे आधार सीडेड इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक खाते काढता येईल. विद्यार्थ्याला मिळणारी शिष्यवृत्ती ही डीबीटी स्वरूपात मिळत असल्याने आधार सीडेड बॅंक खाते असणे अतिशय आवश्‍यक आहे. 

खाते उघडण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःचा आधार क्रमांक, मोबाईल व स्कॉलरशिपसाठी अर्ज करताना आलेला १७ अंकी ‘अप्लीकेशन नंबर’ घेऊन गावातील पोस्ट ऑफिस, यवतमाळ येथील मुख्य डाक घर किंवा पोस्टमनकडे जाऊन ‘इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंकेचे’ आधार सीडेड बॅंक खाते काढून घ्यावे, असे आवाहन डाकघर अधीक्षक मनोहर पत्की यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व ३६९ पोस्ट ऑफिसमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. यासाठीची मोहीम सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना एसएमएस आणि व्हाट्‌सॲपद्वारे याची माहिती कळविण्यात आलेली आहे. जिल्ह्यात सप्टेंबर २०१८ मध्ये इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक सुरू झाली. तेव्हापासून जिल्ह्यात ९० हजार खातेधारक या बॅंकेशी जुळले आहेत. 

लॉकडाउन काळात बॅंकेने ५३ हजार ग्राहकांना रुपये १५ कोटी रुपये घरपोच प्राप्त करून दिले. स्कॉलरशिप खात्यांसह प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना, मातृत्व वंदना योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, मनरेगा, विविध पेन्शन व अन्य सरकारी डीबीटी योजनांचा लाभ ग्राहकांना मिळत आहे. 
- श्रीकांत देशमुख 
शाखा व्यवस्थापक, इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Bird: चातक आफ्रिकेतून एप्रिलमध्येच आला मुक्कामी, दोन महिने आधीच आगमन; मान्सून लवकर सक्रिय होणार?

IPL 2026: राजस्थानची अग्निपरीक्षा २६५ धावा चेस करणाऱ्या वादळी पंजाबला रोखणार कसं? श्रेयस अय्यरचा मास्टरप्लॅन तयार, पाहा संभावित Playing XI

Nitesh Rane: नीतेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा अन् १ लाखाचा दंड; पण शिक्षेला स्थगिती

Akola News: मान्सूनपूर्व देखभाल, दुरुस्तीच्या कामांना वेग; महावितरण; सकाळच्या सत्रात काम करण्याचे नियोजन

Akola News: बाळापूर तालुक्यात आरटीई प्रवेशाचा ‘बाजार’; मध्यस्थांकडून पालकांची आर्थिक लूट? गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी

SCROLL FOR NEXT