Students copied in the online exam in nagpur university 
विदर्भ

ऑनलाइन परीक्षेत 'कॉपी'चा महापूर, विद्यापीठाचा दावा फोल

मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी केलेल्या गैरप्रकारावर आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अ‌ॅपमध्ये सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात विद्यापीठाचा हा दावा फोल ठरला असून ऑनलाइन परीक्षेत, मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे दिसून येते. त्यामुळेच निकालातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 

विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी 'आरटीएमएनयु परीक्षा' नावाचे अ‌ॅप तयार केले. या अ‌ॅपमध्ये विद्यार्थी जेव्हा हालचाल करेल, तेव्हा त्याची फोटो आणि त्याने स्क्रीन बदलल्यास त्याचे मोजमाप करण्यात येऊन अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी सांगितले होते. विशेष म्हणजे, हे प्रकरण अनुशासन समितीकडे पाठविण्यात येईल, असेही स्‍पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार विद्यापीठाने ८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान परीक्षा घेण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी धडाक्यात कॉपी करीत १०० पैकी १०० गुण मिळविल्याचे दिसून आले. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षेचे तीन तेरा वाजले. त्यामुळे कॉपी करण्याची माहिती आणि संबंधित फोटो विद्यापीठाकडे उपलब्ध नसल्याचे दिसून येते. याबाबत तज्ज्ञांना विचारणा केली असता, ७० हजारावर विद्यार्थ्यांचे फोटो आणि माहितीचा डेटा ठेवता येणे अशक्य आहे. त्यामुळे परीक्षेत बरेच अडथळे येण्याची शक्यता असते. त्यात कॉपी करण्यापासून थांबविण्यासाठी यंत्रणाच नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

राज्यातील विद्यापीठातही यंत्रणाच नाही -
ऑनलाइन परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यापीठांद्वारे तयार करण्यात आलेल्या अ‌ॅपमध्ये कुठलीच यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, केवळ नागपूर विद्यापीठच नव्हे तर राज्यातील कोणत्याच विद्यापीठाद्वारे ते वापरण्यात आले नसल्याचे समजते. त्यामळे ऑनलाइन परीक्षेत विद्यार्थ्यांचे चांगलेच फावले असून निकालात ते दिसून आले.

व्हिडिओ व्हायरल -
परीक्षेदरम्यान धडाक्यात कॉपी करीत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्या समोर पुस्तके घेऊन पेपर सोडविण्यात येत असल्याचे दाखविण्यात आले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT