फळ प्रक्रिया केंद्र पूर्ण तयार आहे. काही मशीन्सही केंद्रात लागल्या आहेत; परंतु निधीअभावी प्रकल्प रखडला आहे. प्रक्रिया प्रकल्प आणि तेथील मशनरींची बाबू अच्छेलाल यांनी पाहणी केली.
फळ प्रक्रिया केंद्र पूर्ण तयार आहे. काही मशीन्सही केंद्रात लागल्या आहेत; परंतु निधीअभावी प्रकल्प रखडला आहे. प्रक्रिया प्रकल्प आणि तेथील मशनरींची बाबू अच्छेलाल यांनी पाहणी केली. 
विदर्भ

दिल्ली बाॅर्डरवर शेतकरी सहा महिन्यांपासून तर मंगरुळपीरात १३ वर्षांपासून ताटकळत

सकाळ वृत्तसेवा

मंगरुळपीर (जि. वाशीम) : कृषिप्रधान देश असलेल्या भारतात शेतकऱ्यांनाच न्याय मिळत नाही (Farmers do not get justice), असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, एकीकडे सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सहा महिन्यांपासून ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारकडे वेळ नाही. तर दुसरीकडे वाशीम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचा ठरणारा सुभाष कृषी पणन व प्रक्रिया प्रकल्प १३ वर्षांपासून रखडला (The Subhash Agricultural Marketing and Processing Project has been stalled for 13 years) आहे. दुष्काळप्रवण भाग, अशीच पश्चिम विदर्भाची ओळख आहे. शेती बऱ्यापैकी असल्याने आणि गाठीशी जलप्रकल्पांची समृद्धी असल्याने दरवर्षी चांगले उत्पादन होते. परंतु, शेतीत माल वाढला की भाव पडतात आणि माल कमी असला की वाढतात. यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे नुकसान ठरलेले. त्यामुळे एखादा फळ प्रक्रिया प्रकल्प असला तर त्याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होऊ शकतो. २००४ मध्ये सुरू झालेले शेतमाल प्रक्रिया प्रकल्पाचे काम २००९ मध्ये पूर्ण झाले. परंतु, निधीअभावी तब्बल १३ वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणारा हा प्रकल्प केंद्र आणि राज्य शासनाने लक्ष देऊन पूर्ण करणे (It needs to be completed by the Central and State Governments) गरजेचे आहे. (Subhash-Krishi-Marketing-and-Processing-Project-stalled-due-to-neglect)

मानोरा तालुक्याचा दौरा आटोपून सकाळीच मंगरुळपीर गाठले. ‘सकाळ’चे मंगरुळपीरचे तालुका बातमीदार शरद येवले यांनी ‘रिसिव्ह’ केले. बसस्टॉपवर चहापाणी घेत असताना रस्त्याच्या कडेला भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्याकडे लक्ष गेले. अतिशय कमी किमतीत भाजी विकणाऱ्या त्या भाजीविक्रेत्याकडे पाहून, यांचा उत्पादन खर्चतरी निघतो का हो, हा प्रश्न विचारताच हाच तर येथील शेतकऱ्यांचा रोना असल्याचे येवले यांनी सांगितले. म्हणायला फळप्रक्रिया उद्योग आहे, परंतु निधीअभावी कित्तेक वर्षांपासून तो सुरूच झालेला नाही. त्यामुळे माल असा बेभाव विकाव लागतो जी, असे त्यांनी सांगितले. मग काय निघालो आम्ही सुभाष फळ, फुले प्रक्रिया प्रकल्पाकडे.

कृषी मालावर प्रक्रिया करून त्यापासून टोमॅटो केचप, विविध फळांचे ज्युस, पिकल्स, मॅंगो पल्प, पपई चेरी, पपई पल्प इत्यादी तयार करण्याचे काम या प्रकल्पात करण्यात येईल. ज्यामुळे शेतकऱ्यांना सोईचे होईल. शेतमालावर प्रक्रिया करणारा उद्योग निर्माण झाल्यास वाहतूक खर्चासोबत मालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यास तो विकण्याचा प्रश्न शेतकऱ्यांपुढे राहणार नाही. एखाद्या पिकाचे जास्त उत्पादन झाल्यास बाजारात भाव पडतात. अशावेळी बाजारात जाऊन माल विकणे शेतकऱ्यांना परवडणारे नसते. यातून उत्पादनाचा खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकरी बेभाव मालाची विक्री करतात. यात त्यांचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे.

साठवण केंद्र फायदेशीर

प्रक्रिया केंद्रात ९० मेट्रिक टनाचे पाच कोल्ड स्टोरेज आहेत. परिसरातील शेतकऱ्यांची फळे पिकविणे व शीतगृहामध्ये भाडे तत्त्वावर फळे ठेवणे यासाठी ते राखीव राहणार आहेत. हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. कारण बरेचदा हाताशी आलेले पीक केवळ ठेवण्यासाठी योग्य जागा नसल्याने मातीमोल होते. प्रक्रिया केंद्रात भाडेतत्त्वावर शीतगृहात फळे ठेवता येणार असल्याने शेतकऱ्यांची पिके खराब होणार नाही. ज्यामुळे त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळेल.

शेतकरीहित लक्षात घेऊनच उभारणी

सुभाष ठाकरे यांनी वाशीम जिल्हा व परिसरातील वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या तसेच परिसरातील फळे भाजीपाला उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा. तसेच परिसरातील फळे, भाजीपाल्यावर प्रक्रिया करून यातून शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढवावी व जिल्ह्यातील बेरोजगार तसेच कुशल कामगारांच्या हाताला काम मिळावे. त्यांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने शेतकऱ्यांशी चर्चा करून हा फळे, भाजीपाला प्रक्रिया प्रकल्प सहकारी तत्त्वावर संस्थेमार्फत २००९ मध्ये उभारला. संस्थेच्या प्रकल्पाची सुसज्य इमारत व संपूर्ण यंत्र सामग्रीसह मंगरुळपीर-अकोला महामार्गावर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर जिल्ह्यातील प्रमुख नदी असलेल्या अडाण नदीच्या शेजारी उभारला.

पश्चिम विदर्भातील वाढत्या शेतकरी आत्महत्या लक्षात घेऊन व जिल्ह्यातील वाढत्या फळ, भाजीपाला उत्पादनाला चांगला भाव मिळावा, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी संस्थेचे शेतकरी, सभासदांचे स्वभाग भांडवल तसेच शासकीय भाग भांडवल व राष्ट्रीय सहकारी विकास निगम यांच्या वित्तीय कर्जातून हा प्रकल्प उभारला. प्रकल्प उभारणी करण्यास वेळेच्या आत आर्थिक उपलब्धता न झाल्याने व प्रकल्पाची किंमत वाढली. २००९ मध्ये पूर्ण क्षमतेने उभारलेला हा प्रकल्प अद्याप कार्यान्वित झालेला नाही, याची खंत वाटते.
- सुभाष ठाकरे, माजी मंत्री
शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळून फळे, भाजीपाला उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्ह्यामध्ये आपला माल विकण्यास दूरच्या बाजारपेठेत न जाता प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाला लागणारा माल उत्पादित करून आर्थिक उन्नती साधण्याची संधी मिळाली आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास शेतकरी व बेरोजगार युवकांना सुवर्ण संधी ठरू शकेल.
- राजेंद्र मिसाळ, उपाध्यक्ष, जिनिंग व प्रेसिंग, मंगरुळपीर

(Subhash-Krishi-Marketing-and-Processing-Project-stalled-due-to-neglect)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT